शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ३.६० लाखावर स्मृतिभ्रंश रुग्ण

By admin | Updated: December 15, 2015 04:01 IST

अल्झायमर अ‍ॅण्ड रिलेटेड डिसआॅर्डर सोसायटी आॅफ इंडिया या संस्थेने केलेल्या अंदाजित अनुमानानुसार सन २०१६ पर्यंत अल्झायमर (स्मृतिभ्रंश) या लक्षणांचे ३ लाख ६० हजार १०० रुग्ण

नागपूर : अल्झायमर अ‍ॅण्ड रिलेटेड डिसआॅर्डर सोसायटी आॅफ इंडिया या संस्थेने केलेल्या अंदाजित अनुमानानुसार सन २०१६ पर्यंत अल्झायमर (स्मृतिभ्रंश) या लक्षणांचे ३ लाख ६० हजार १०० रुग्ण महाराष्ट्रात असतील, असे २०१० च्या अहवालात म्हटले आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सोमवारी विधानसभेत उपस्थित एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. आमदार सुनील प्रभू, सुधाकर देशमुख, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, सुधाकर कोहळे, संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना डॉ. सावंत यांनी सांगितले की, नेहमीच्या कामात गोंधळून जाणे, वार, तारीख विसरणे, साधी कामे करताना काही गोष्टी विसरणे ही स्मृतीभ्रंश आजाराची लक्षणे आहेत. अल्झायमर अ‍ॅण्ड रिलेटेड सोसायटी आॅफ इंडिया या संस्थेने केलेल्या अंदाजित अनुमानानुसार दर १५ वर्षांनी अल्झायमरग्रस्तांची संख्या दुप्पट होत असल्याचे अहवलात दिसून येते. महाराष्ट्रात ४ प्रादेशिक मनोरुग्णालय, १२ जिल्हा मानसिक आरोग्य केंद्र, १४ वैद्यकीय महाविद्यालय तसेच ४ महानगरपालिका रुग्णालयात अल्झायमर (स्मृतिभ्रंश) ग्रस्त रुग्णांना आरोग्य सेवा दिल्या जातात. प्रतिबंधक उपाययोजनांच्या दृष्टीने जास्तीत जास्त लोकांना या आजाराची माहिती देण्याकरिता व त्यांचे लवकर निदान होण्याकरिता या आजाराबद्दल माहिती दिली जाते.(प्रतिनिधी)