शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यू आजाराने बालिकेचा मृत्यू

By admin | Updated: August 10, 2014 01:25 IST

डेंग्यू या ताप रोगाने दहा वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली.

एकलारा बानोदा : डेंग्यू या ताप रोगाने दहा वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून, आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. एकलारा येथील आरती अशोक हागे या बालिकेला ताप आल्याने तिच्यावर उपचार सुरू होते. उपचारानंतर ताप बरा होत नसल्याने घरातील मंडळींनी तिला अकोला येथील खासगी रुग्णालयात भरती केले. दरम्यान, प्रकृती खालावल्याने अखेर तिचा गुरुवारी सायंकाळी मृत्यू झाला. अकोला येथील खासगी दवाखान्यातील अहवालानुसार तिचा मृत्यू हा डेंगी तापाने झाल्याचे उघडकीस आले. त्यामुळे गावात खळबळ उडाली असून, अजूनही गावात अशा आजाराचे रुग्ण आहेत काय, या बाबत आरोग्य विभागाने तातडीने चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.

** आरोग्य पथक दाखल

गावातील एका दहा वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याच्या घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभाग खळबळून जागा झाला. शुक्रवार आणि शनिवारी वानखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक गावात ठाण मांडून बसले आहेत. गावातील विविध घरांच्या सर्व्हेसोबतच पिण्याच्या पाण्याच्या भांड्यांचीही तपासणी आरोग्य पथकाकडून करण्यात आली. या पथकामध्ये वानखेड येथील आरोग्य सहा एस.पी. पिसे यांच्यासह अनेक कर्मचार्‍यांचा समावेश आहे. बुलडाणा येथील आरोग्य पथकही आज शनिवारी गावात धडकले होते.