शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका आयुक्तांच्या सिक्स पॅकची चर्चा

By admin | Updated: April 1, 2017 02:44 IST

पुणे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांच्या ‘सिक्स पॅक बॉडी’चा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

पुणे : पुणे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांच्या ‘सिक्स पॅक बॉडी’चा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यांच्या पर्सनल ट्रेनरकडून ‘वर्षांपूर्वी आणि आता’ असे आशय असलेले हे छायाचित्र आहे. त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. एक वर्षापूर्वीचा व आताचा सिक्स पॅकची बॉडी दाखविणारा असे दोन फोटो असलेली पोस्ट सध्या व्हॉट्सअ‍ॅपवरून व्हायरल झालेली आहे. अवघ्या एका वर्षात त्यांनी व्यायाम करून हा बदल घडविला असल्याचे या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांचे ट्रेनर यांनी फेसबुकवर ही पोस्ट टाकली होती. या पोस्टला हजारो लाइक्स मिळाल्या आहेत, त्याचबरोबर व्हॉट्स अ‍ॅपच्या अनेक ग्रुपवरून ती शहरात मोठ्या प्रमाणात फिरली आहे. कुणाल कुमार यांनी १४ मार्च २०१६ रोजी व्यायामाला सुरुवात केली होती. त्यानंतर एक वर्षभर त्यांनी व्यायाम केला. त्याचबरोबर ट्रेनरच्या सूचनेनुसार त्यांनी योग्य तो डाएट घेतला. त्यामुळे अवघ्या एका वर्षात सिक्स पॅकची बॉडी बनविल्याचे त्यांच्या ट्रेनरने टाकलेल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. सोशल मीडियावर फिरत असलेल्या मेसेजेसमध्ये, आयुक्तांनी स्वत:च्या शरीरापेक्षा शहराच्या सुदृढतेकडे अधिक लक्ष दिले असते तर ते योग्य झाले असते, अशा भावना पुणेकरांकडून व्यक्त केल्या जात आहेत. महापालिका आयुक्त या वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांचे फोटो असे व्हाइरल होणे योग्य नाही, अशी चर्चाही आहे. हा जाहिरातीचाच प्रकार असल्याचे आक्षेपही घेण्यात येत आहेत. महापालिकेच्या आयुक्तपदावरील व्यक्तीने अशा प्रकारे स्वत:चा उघडा फोटो सोशल मीडियावर तसेच फेसबुकवर टाकणे अयोग्य आहे. त्या पदाची प्रतिष्ठा राखली गेली पाहिजे. व्यक्तीपेक्षा पदाची प्रतिष्ठा जपणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यांनी हे छायाचित्र सोशल मीडियावरून काढून टाकावे. निदान फेसबुकवरील छायचित्र तरी हटवले पाहिजे.- विवेक वेलणकर, सजग नागरिक मंच