शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

कुलगुरूंच्या परतण्यावर विद्यापीठात चर्चा सुरू  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 05:17 IST

आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे निकालात झालेल्या गोंधळामुळे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. आता निकालाचे काम पूर्ण होत आल्यावर कुलगुरू देशमुख यांनी पुन्हा रुजू होण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी राज्यपालांना पत्र लिहिले.

मुंबई : आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे निकालात झालेल्या गोंधळामुळे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. आता निकालाचे काम पूर्ण होत आल्यावर कुलगुरू देशमुख यांनी पुन्हा रुजू होण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी राज्यपालांना पत्र लिहिले. पण तेथून काहीच उत्तर न आल्याने त्यांनी थेट दिल्लीशी संपर्क साधल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यामुळे कुलगुरूंच्या वापसीची जोरदार चर्चा सुरू असली तरी राज्य सरकारकडून कोणतीही हालचाल झालेली नाही.एप्रिल महिन्यात कुलगुरू देशमुख यांनी आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीची घोषणा केली. पण त्यातील तांत्रिक अडचणींमुळे सप्टेंबर महिना उजाडूनही हजारो विद्यार्थी हे निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. निकालाच्या गोंधळामुळे राज्यपालांनी स्वत: या प्रकरणात लक्ष घातले. त्यानंतर, ९ आॅगस्टपासून कुलगुरू सुटीवर आहेत. यानंतर निकालांचे काम प्रभारी खांद्यावर सोपवण्यात आले. आता निकालाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्या वेळी देशमुख यांनी रुजू होण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. पण राजकीय वर्तुळात देशमुखांसाठी पूरक वातावरण नाही. राज्यपालांना पत्र पाठवून बरेच दिवस झाले, पण राजभवनाने सध्या फक्त निकालावर लक्ष केंद्रित केले आहे. तसेच शिक्षणमंत्र्यांनीही या प्रश्नावर अजून काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ३२ हजार उत्तरपत्रिकांची तपासणी बाकीचसप्टेंबर महिना उजाडूनही मुंबई विद्यापीठाला तब्बल ३२ हजार ७४५ उत्तरपत्रिकांची तपासणी करायची आहे. रविवारी ४ हजार ३४९ उत्तरपत्रिकांची तपासणी झाली. तर विद्यापीठाच्या ४७७ निकालांपैकी ४६९ निकाल जाहीर करण्यात आले आहेत. अजून ८ निकाल जाहीर झालेले नाहीत.

टॅग्स :Mumbai Universityमुंबई विद्यापीठ