शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक अपयश झाकण्यासाठी देशभक्तीची चर्चा

By admin | Updated: March 7, 2016 03:37 IST

आर्थिक आघाडीवर सरकारला आलेले अपयश झाकण्यासाठी आक्रमकपणे देशभक्तीची चर्चा करण्यात येत असल्याची टीका, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी केली.

मुंबई : आर्थिक आघाडीवर सरकारला आलेले अपयश झाकण्यासाठी आक्रमकपणे देशभक्तीची चर्चा करण्यात येत असल्याची टीका, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी केली. आर्थिक ओझ्याखाली दबलेले सामान्य नागरिक आणि शेतकरी वर्गाच्या नाराजीचे रूपांतर आंदोलनात होऊ नये, यासाठीच देशभक्तीचा मुद्दा पुढे करण्यात आल्याचे येचुरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पुरोगामी संस्था, संघटना आणि डाव्या आघाडीच्या वतीने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात आयोजित चर्चासत्रात येचुरी म्हणाले की, ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाची आक्रमक विचारधारा थोपविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी देशभक्तीच्या भावनेचा दुरुपयोग केला जात आहे.’ प्रत्यक्ष करात सूट देऊन केंद्र सरकारने धनदांडग्यांची सोय केली. या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर ६ लाख ११ हजार कोटींचा बोजा पडणार असल्याचे खुद्द सरकारनेच मान्य केले आहे. धनदांडग्यांना सवलत देणारे सरकार सामान्य जनतेवर मात्र अप्रत्यक्ष कराचा बोजा लादत आहे. मोदी सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या २६ टक्क्क््यांनी वाढल्याचा आरोप येचुरी यांनी केला. मोदी सरकारला हटविण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे येचुरी या वेळी म्हणाले. मात्र, प. बंगालमधील आगामी निवडणुकीत काँग्रेसशी आघाडी अथवा युतीची शक्यता नसल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. आगामी निवडणुकांसाठी भाजपाने जोरदार तयारी चालविली आहे. मात्र, आसाम वगळता उर्वरित चार राज्यांमध्ये भाजपाचे अस्तित्व नगण्य आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपाला स्थान नसल्याचे येचुरी म्हणाले. (प्रतिनिधी)