शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

स्थायी समिती अध्यक्षांविनाच एलबीटीची चर्चा

By admin | Updated: June 9, 2014 23:38 IST

स्थानिक संस्था कर ( एलबीटी) रद्द करण्यासाठी महापालिकांच्या महापौर आणि आयुक्तांची बैठक मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्या ( मंगळवारी) मुंबई येथे बोलाविली आहे.

पुणे : राज्यातील महापालिकांच्या हददीतून जकात हद्दपार करून मागील वर्षीच लागू करण्यात आलेला स्थानिक संस्था कर ( एलबीटी) रद्द करण्यासाठी महापालिकांच्या महापौर आणि आयुक्तांची बैठक मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्या ( मंगळवारी) मुंबई येथे बोलाविली आहे. मात्र, महापालिकांच्या आर्थिक चाव्या आणि पालिकेच्या अंदाजपत्रकाची अंमलबजावणी करणा-या पालिकांच्या स्थायी समिती अध्यक्षांनाच या बैठकीतून वगळण्यात आल्याचे आज समोर आले. पुण्याच्या महापौर चंचला कोद्रे यांना या बैठकीचे निमंत्रण आले असले तरी, रात्री उशिरा पर्यंत आपणास या बैठकीचे कोणतेही निमंत्रण मिळाले नसल्याचे कर्णे गुरूजी यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले.राज्यशासनाने व्यापा-यांच्या मागणीनुसार, एप्रिल 2013 पासून राज्यातील 25 महापालिकांमध्ये जकात रद्द करून एलबीटी लागू केलेला आहे. मात्र, या कायद्यातील तरतूदीही जाचक असल्याने व्यापा-यांनी एलबीटी रद्द करण्याची मागणी केली आहे. लोकसभा निवडणूकीत या मागणीसाठी व्यापारी वर्गाने भारतीय जनता पक्षास पाठींबा दिल्याने त्याचा फटका राज्यातील आघाडी सरकारला बसला आहे. त्यामुळे शासनाकडून एलबीटीला पर्याय शोधले असून उद्या होणा-या बैठकीत महापालिका आयुक्त आणि शहराच्या प्रथम नागरिक असणा-या महापौरांना ती माहिती देण्यात येणार आहे. तसेच त्याची बाजू ऐकूण घेण्यात येणार आहे. मात्र, या बैठकी पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या असणा-या आणि संपूर्ण अंदाजपत्रकाचा गाडा हाकणा-या स्थायी समिती अध्यक्षांनाच डावलण्यात आल्याचे आज दिसून आले. महापौर चंचला कोद्रे यांनी या बैठकीची माहिती दिली त्यावेळी स्थायी समिती अध्यक्ष बापूराव कर्णे गुरूजीही उपस्थित होते. कर्णे यांना निमंत्रणाबाबत विचारणा केली असता, शासनाकडून कोणतेही निमंत्रण आले नसल्याचे ते म्हणाले. तसेच आता महापालिकेची बाजू महापौर मांडतील आपण आपल्या पक्षश्रेष्ठीकडे याबाबत खुलासा केला असून शासन योग्य पर्याय काढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मात्र, पालिकेची आर्थिक जबाबदारी सांभाळणा-या स्थायी अध्यक्षांनाच निमंत्रण नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.