शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाची रिपाइंबरोबरही चर्चा

By admin | Updated: January 18, 2017 01:26 IST

शिवसेनेबरोबर भारतीय जनता पक्षाला रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले गट) यांच्याबरोबरही चर्चा करावी लागत आहे.

पुणे : शिवसेनेबरोबर भारतीय जनता पक्षाला रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले गट) यांच्याबरोबरही चर्चा करावी लागत आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांनी रिपाइंचे अध्यक्ष महेंद्र कांबळे यांच्याबरोबर सोमवारी सायंकाळी चर्चा केली. रिपाइंने आपली २८ जागांची मागणी कायम ठेवली असून त्या शहराच्या वेगवेगळ्या प्रभागांमधील राखीव जागा आहेत. तिथे रिपाइंचे मतदान असल्याने त्याचा भाजपालाही उपयोग होईल, अशी भूमिका कांबळे यांनी बापट यांच्यापुढे मांडली आहे.पक्षाचे पालिकेतील गटनेते डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी ही माहिती दिली. भाजपाबरोबर आमची लोकसभा निवडणुकीपासून युती आहे. पक्षाचे नेते केंद्रीय समाजकल्याणमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार महापालिका निवडणुकीतही ही युती कायम आहे. संपूर्ण शहराचा अभ्यास करून आम्ही या २८ जागा निश्चित केल्या आहेत. त्याचा आम्हाला उपयोग होईलच, शिवाय आमचे मतदान भाजपालाही उपयोगी पडणार आहे, असे डॉ. धेंडे म्हणाले.भाजपाला प्रस्ताव दिला आहे. त्यांनी यावर पक्ष पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा करू, असे सांगितले आहे. मंत्री आठवले यांना याबाबत माहिती दिली आहे. मागील निवडणुकीत रिपाइंने १५ जागा लढविल्या होत्या, मात्र या वेळी पक्षासाठी समाजात चांगले वातावरण आहे. दुसरा पर्याय नसल्यामुळे रिपाइंलाच मतदान होणार आहे. त्यामुळे जास्त जागांची मागणी करण्यात आली असल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. येत्या एक-दोन दिवसांत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे, असे डॉ. धेंडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी) >रिपाइंच्या वतीने भाजपाच्या कमळ या चिन्हावर निवडणूक लढवण्यास नकार देण्यात आला आहे. रिपाइंचे पारंपरिक हत्ती हे निवडणूक चिन्ह बऱ्याच वर्षांपूर्वी गोठविण्यात आले. त्यानंतर त्यांनी कपबशी व अन्य काही चिन्हांवर निवडणुका लढविल्या. आता त्यांनी पक्षाच्या वतीने आयोगाकडे संपूर्ण राज्यासाठी रिपाइंच्या उमेदवारांना कपबशी हे एकच चिन्ह द्यावे, अशी मागणी केली आहे. ती मान्य झाल्यास रिपाइंचे उमेदवार त्याच चिन्हावर निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.