शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपट्टी थकबाकीदारांच्या नळ जोडण्या खंडित करा : आयुक्तांचे आदेश

By admin | Updated: November 13, 2016 17:13 IST

पाणी कराची थकबाकी वसुलीपोटी पाणीपट्टी थकबाकीदारांच्या नळ जोडण्या त्वरित खंडित करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले

ऑनलाइन लोकमतठाणे, दि. 13 - पाणी कराची थकबाकी वसुलीपोटी पाणीपट्टी थकबाकीदारांच्या नळ जोडण्या त्वरित खंडित करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले असून कालपासून वागळे, रायलादेवी आणि दिवा प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. दरम्यान जुन्या ५०० आणि १००० रुपयांच्या चलनामध्ये महापालिकेची विविध देयके भरण्याचा शेवटचा दिवस असून, नागरिकांनी आपली देयके त्वरीत भरावीत असे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.     पाणीपट्टी वसूल करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्यावतीने वागळे इस्टेट, रायलादेवी प्रभाग समिती आणि दिवा प्रभागामधील पाणी कर थकबाकीदारांची नळ संयोजने खंडित करण्याची कारवाई कालपासून हाती घेण्यात आली आहे. या कारवाई अंतर्गत जवळपास १२० नळ संयोजने खंडीत करण्यात आली आहेत.      उद्या जुन्या चलनाच्या माध्यमातून महापालिकेची देयके भरण्याचा शेवटचा दिवस असून नागरिकांनी आपली थकबाकी न भरल्यास दिनांक १५ नोव्हेंबरपासून मोठ्या प्रमाणात नळ संयोजने खंडीत करण्याची कारवाई हाती घेण्यात येणार आहे. दरम्यान आज महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी महापालिकेच्या सर्व भरणा केंद्रांवर भेट देऊन कामाची पाहणी केली. सोमवार दिनांक १४ नोव्हेंबर रोजी रात्री १२ पर्यंत ही भरणा केंद्रे सुरू राहणार आहेत.