शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकल प्रवेशप्रकरणी राज्याची निराशा

By admin | Updated: May 6, 2017 04:30 IST

खासगी आणि अभिमत वैद्यकीय महाविद्यालयांतील ६७ टक्के अधिवास कोट्याला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला स्थगिती

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : खासगी आणि अभिमत वैद्यकीय महाविद्यालयांतील ६७ टक्के अधिवास कोट्याला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला स्थगिती आदेश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी कायम ठेवून महाराष्ट्र सरकारची याचिका फेटाळली. या निर्णयामुळे इतर राज्यांतील गुणवंत विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील खासगी आणि अभिमत वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेश घेण्याचा मार्ग मोकळा होईल. महाराष्ट्रात १५ वर्षे स्थायिक असलेल्यांना ६७ टक्के जागा राखून ठेवल्यानंतर इतर राज्यांतील विद्यार्थी या ६७ टक्के जागांसाठी अपात्र ठरले होते. पदव्युत्तर वैद्यकीय आणि दंत अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नव्याने गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याचा ७ मे हा शेवटचा दिवस आता न्यायालयाने ९ मे केला आहे, असे महाराष्ट्र सरकारचे वकील निशिकांत कातनेश्वरकर यांनी सांगितले. यामुळे राज्य सरकारला गुणवत्तेच्या आधारावर नव्याने यादी करण्यास वेळ मिळालेला आहे. महाराष्ट्र सरकारने पहिली गुणवत्ता यादी जाहीर करायच्या आधी तीन दिवस म्हणजे २७ एप्रिल रोजी ६७ टक्के कोटा जाहीर केला होता. या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने ३० एप्रिल रोजी स्थगिती दिली होती. एकदा खेळ सुरू झाल्यावर त्याच्या नियमांत बदल केले जाऊ शकत नाहीत, असे उच्च न्यायालयाने स्थगिती आदेशात म्हटले होते. महाराष्ट्रात आरोग्य सेवा अधिक चांगली असावी यासाठी महाराष्ट्रातील उमेदवारांना जास्तीत जास्त जागा मिळण्याचा हेतू या कोट्यामागे होता,  असा युक्तिवाद उच्च न्यायालयात राज्याने केला होता. तथापि, तो फेटाळण्यात आला. उच्च न्यायालयाच्या स्थगिती आदेशानंतर लगेचच राज्य सरकारला ३० एप्रिल रोजी जाहीर केलेली गुणवत्ता यादी रद्द करावी लागली.दोन हजार विद्यार्थी इतर राज्यांतील या वर्षी महाराष्ट्रात ६,५०० पेक्षा जास्त वैद्यकीय विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर प्रवेशासाठी अर्ज केला होता. त्यातील जवळपास दोन हजार विद्यार्थी इतर राज्यांतील होते. एकूण ३,३०० जागा भरायच्या आहेत.