शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सुकाणू समितीतील मतभेद उघड!

By admin | Updated: June 11, 2017 04:53 IST

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी स्थापन झालेल्या सुकाणू समितीने बोलावलेल्या पत्रकार परिषदेतच समितीच्या नेत्यांमधील मतभेद जाहीर झाले. रविवारच्या बैठकीला

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी स्थापन झालेल्या सुकाणू समितीने बोलावलेल्या पत्रकार परिषदेतच समितीच्या नेत्यांमधील मतभेद जाहीर झाले. रविवारच्या बैठकीला कोण जाणार, याची निवड करण्याचे अधिकार खासदार राजू शेट्टी यांना देण्यात आल्याचे शेकापचे जयंत पाटील यांनी जाहीर करताच, शेतकरी संघटनेचे रघुनाथ पाटील यांनी असे काही होणार नाही, सर्व ३५ संघटनांचे सदस्य बैठकीला जातील, असे माइक स्वत:कडे ओढून घेत जाहीर करून टाकले.सरकारने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय मंत्रीगट परिषदेने सुकाणू समितीच्या सदस्यांना रविवारी चर्चा करण्यासाठी येण्याचे रितसर निमंत्रण दिले असून, ही चर्चा दुपारी १ वाजता सह्याद्री अतिथीगृहावर होईल, अशी माहिती मंत्रीगट परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.मुंबईत शेकापच्या कार्यालयात राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढा देणाऱ्या ३५ संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. त्यास खा. राजू शेट्टी, जयंत पाटील, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, डॉ. अजित नवले, नामदेव गावडे, गणेश कदम, प्रतिभा शिंदेंनी सुरुवातीपासून हजर होते. मात्र, डॉ. गिरधर पाटील, अनिल घनवट, रामचंद्रबापू पाटील आणि डॉ. बुधाजीराव मुळीक हे बैठकीला आले नाहीत. तर रघुनाथ पाटील उशिरा आले.डॉ. गिरधर पाटील यांनी या बैठकीवर टीकेची झोड उठवली. बैठकीचे निमंत्रण सर्वांना देण्यात आले. पण आपल्याला याची माहितीही दिली गेली नाही, असे डॉ. पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. समितीतले काही विशिष्ट लोक परस्पर निर्णय घेतात, असे सांगून डॉ. पाटील म्हणाले, सरकारशी चर्चा करण्याची ही योग्य वेळ नाही. शेतकरी आंदोलकांचे गुन्हे मागे घ्या, मगच चर्चा करा असा पहिला ठराव होता. पण त्यावर चर्चा करण्याची इच्छा नसल्याचे सांगत समितीतल्या काही सदस्यांनी आक्षेप घेतला आहे.सरकार ३१ आॅक्टोबर कर्जमाफी करू, असे सांगत असले तरी, तोपर्यंत थांबण्यास आम्हाला वेळ नाही, असे रघुनाथ पाटील म्हणाले. तर त्यांच्याच शेजारी बसलेल्या खा. राजू शेट्टी यांनी मात्र रविवारच्या बैठकीत काही निर्णय होणार नाही हे आम्हाला माहिती आहे पण सरकारची म्हणणे काय आहे ते कळेल, असे सांगितले. तर जयंत पाटील यांनी सामंजस्याची भूमिका घेत, सरकारचे म्हणणे समजून घेऊन पुढील निर्णय घेऊ, असे सांगत वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला. सरकारसमवेत रविवारी चर्चा होणार असली तरी सोमवारचे धरणे आंदोलन आणि मंगळवारचे रेल रोको आंदोलन ठरल्याप्रमाणे होईलच, असेही खा. शेट्टी व जयंत पाटील यांनी जाहीर केले.सुकाणू समितीतील मतभेद टाळण्यासाठी समितीची विभागणी करुन एक कोअर कमिटी आणि एक व्यापक समिती असेल. समन्वयासाठी कोअर कमिटी आणि आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी व्यापक समिती काम करेल अशी चर्चा शनिवारी झाली पण बैठकीस उशिरा आलेल्या रघुनाथ पाटील यांनी सगळे सदस्य बैठकीला जातील, असे सांगत या मुद्यालाही खोडा घातला. रविवारच्या बैठकीत लगेच काही ठरणार नाही. काही निवडक मंडळी सह्याद्रीवर जातील. ३० ते ४० जण जाऊन काय चर्चा होणार?- खा. राजू शेट्टीसुकाणू समितीचे निवडक सदस्य रविवारच्या बैठकीत जातील. त्यांची नावे निवडण्याचे अधिकार आज झालेल्या बैठकीत आम्ही राजू शेट्टी यांना दिले आहेत. रघुनाथ पाटील उशिरा आल्याने त्यांना हा निर्णय माहिती नाही. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत.- आ. जयंत पाटीलतसे काहीही होणार नाही... उशिरा आलो म्हणून काय झाले ? सगळेच्या सगळे ३५ सदस्य बैठकीला जातील. हे मी तुम्हाला आश्वासन देतो.- रघुनाथ पाटीलसुकाणू समितीच्या बैठकीला उपस्थित न राहण्याचा मी निर्णय घेतला. बैठकीचं निमंत्रणही मला दिले नव्हते. ही समिती नेमल्याचीही माहिती नव्हती. या समितीत राजकीय थिल्लरपणा सुरू आहे.- डॉ. गिरधर पाटील डॉ. गिरधर पाटील खोट बोलत आहेत. आजच्या बैठकीसाठी आम्ही सगळ्यांना फोन करून निमंत्रण दिले आहे. ते असे का म्हणत आहेत, हे माहीत नाही.- राजू देसले, निमंत्रक, सुकाणू समिती