शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेसाठी विस्कळीत धडपड

By admin | Updated: November 13, 2014 01:34 IST

भाजपासोबत सत्तेत जाण्यासाठी शिवसेना शेवटच्या क्षणार्पयत धडपड करीत राहिली़ मात्र भाजपाने सगळ्या गोष्टी ठरवल्यानुसार पार पाडल्या आणि सेनेला विरोधी पक्षनेतेपदावर समाधान मानावे लागले.

मुंबई : भाजपासोबत सत्तेत जाण्यासाठी शिवसेना शेवटच्या क्षणार्पयत धडपड करीत राहिली़ मात्र भाजपाने सगळ्या गोष्टी ठरवल्यानुसार पार पाडल्या आणि सेनेला विरोधी पक्षनेतेपदावर समाधान मानावे लागले. सत्तेजवळ जाण्याची धडपड शेवटच्या क्षणी एवढी वाढली की नव्या अध्यक्षांच्या अभिनंदनाची भाषणो सुरू असतानाही सेनेच्या आणि भाजपाच्या बाकावरून चिठ्ठय़ांचे आदानप्रदान सुरू होते.
सकाळी रामदास कदम यांनी शिवसेना विरोधात बसणार, असे जाहीर केले. त्यानंतर काही वेळातच मिलिंद नाव्रेकर विधान भवनात आले. हे दोघेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात गेले. तेथे पुन्हा चर्चा सुरू झाली. दरम्यान, सभागृहाची वेळ झाली. भाजपा नेते सभागृहात आले तेव्हादेखील खाणाखुणा, चिठ्ठी पाठवणो, सभागृहाबाहेर जाणो असे प्रकार सुरू होते. 
खासदार अनिल देसाई यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार, हे कळताच सेनेच्या खासदारांचा एक गट प्रचंड अस्वस्थ झाला. राज्यमंत्री आपण घ्यायचे नाही, असे कारण पुढे करीत या गटाने टोकाची भूमिका घेतल्यानेच देसाई यांना दिल्ली विमानतळावरूनच मुंबईला परतावे लागले. दुसरीकडे राज्यात 15 वर्षानंतर सत्ता मिळत असताना ती का नाकारायची, असे सांगत आमदार आक्रमक झाले. नीलम गो:हे, दिवाकर रावते, रामदास कदम, सचिन सावंत या विधान परिषद सदस्यांना मंत्री व्हावे, असे तीव्रतेने वाटत होते. तर सेनेत तिसरा गट निष्ठावंत होता, ज्यांना सुरू असलेले सगळे नाटय़ लाचारीचे वाटत होते. त्यांना शिवसेनेचा स्वाभिमान गहाण टाकून सत्ता नको होती.
सभागृहाबाहेर या सर्व रस्सीखेचात खा. संजय राऊत, मिलिंद नाव्रेकर, सुभाष देसाई यांच्या भूमिका पक्षाला मदत करणा:या आहेत की विरोधात, हे स्पष्ट होत नव्हते.  सकाळी विरोधी पक्ष नेतेपदाची निवड होत असतानादेखील शिवसेनेचेच काही सदस्य कशाला एकनाथ शिंदे शपथ घेत आहेत, असे बोलत होते. लाल दिव्याची गाडी आपल्याला न मिळता एकटय़ा शिंदेंना मिळते आहे, हे देखील त्या नाराजीचे एक कारण होते. विरोधी पक्षनेते पद मिळाल्यानंतरही सेनेच्या चेह:यावर आनंदाऐवजी हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास गेल्याचेच दु:ख अधिक होते. ही अस्वस्था इतकी टोकाची होती की राज्यपालांच्या अभिभाषणावेळी देखील काँग्रेस घोषणाबाजी करीत होती, राष्ट्रवादी शांत बसून होती आणि विरोधी पक्षाचे माप पदरात पाडून घेणा:या शिवसेनेने करायचे तरी काय, हा प्रश्न प्रत्येकाच्या चेह:यावर होता. (प्रतिनिधी)
 
च्सकाळी विश्वासदर्शक ठरावावेळी देखील ज्या पद्धतीचे फ्लोअर मॅनेजमेंट करायला पाहिजे होते, ते देखील सेनेने केले नव्हते. पोल मागायचा तो नेमका कोणत्या वेळी, यावरूनही गोंधळ उडाला होता.
च्मतदान मागायचे होते तर विधानसभेत वेलमध्ये न उतरता सगळ्यांनी मोठय़ा आवाजात तेवढीच मागणी लावून धरली असती, तरी अध्यक्षांना पुढे जाता आले नसते. मात्र अशा संकटकाळी नेमके काय करायचे याचे नियोजनच सेनेच्या आमदारांजवळ नव्हते.
च्सभागृहाबाहेर या सर्व रस्सीखेचीत खा. संजय राऊत, मिलिंद नाव्रेकर, सुभाष देसाई यांच्या भूमिका पक्षाला मदत करणा:या आहेत की विरोधात, हे स्पष्ट होत नव्हते. नाव्रेकर यांचा तेथे असणारा वावर सगळ्यांच्या भुवया उंचावणारा होता. सकाळी विरोधी पक्षनेते पदाची निवड होत असतानादेखील शिवसेनेचेच काही सदस्य कशाला एकनाथ शिंदे शपथ घेत आहेत, असे बोलत होते.