कारंजा: तालुक्यातील ग्राम उंबर्डा बाजार जिल्हा परिषद शाळेतील बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा फेबुवारी २०१६ मध्ये घेण्यात आली होती. या परीक्षेत नापास झालेल्या २१ विद्यार्थ्यांचा इंग्रजी विषयाचा पेपर अमरावती बोर्डाने १२ जुलै रोजी परीक्षा सकाळी १०: ३० या वेळात होणार असल्याचे संबधित शाळांना पत्राव्दारे कळविले होते. शाळेच्यावतिने सदर पेपर २.३० वाजता असल्याचे सांगितल्याने २१ परिक्षार्थी पेपर देवू शकले नाही.विद्यार्थ्यांना परीक्षेचे वेळापत्रक जिल्हा परिषद शाळेतील प्राचार्य व शिक्षकांनी चुकीचे सांगितले. त्यामुळे विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पेपर झाल्यावर गेल्यामुळे इंग्रजी विषयाच्या परीक्षेपासून २१ विद्यार्थी वंचीत राहीले असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यामुळे संबधित प्राचार्य व शिक्षकाविरूध्द कारवाई करण्यात करावी अशी मागणी विदयार्थ्यांनी शिक्षणाधिकारी माध्यमिक वाशिम यांना पाठवलेल्या निवेदनातून केलीे आहे. जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय उंबर्डाबाजार येथील १२ वीच्या परीक्षा फेबुवारी २०१६ मध्ये पार पडली. या परीक्षेत २१ विद्यार्थी इंग्रजी विषयात नापास झाल्यामुळे त्या विद्यार्थ्यांची परीक्षा १२ जुलै रोजी कारंजा येथील कि.न.महाविद्यालयात सकाळी १०:३० ते १:३० या वेळात होती. परंतु परीक्षा ही कि.न.महाविाद्यालय येथे १२ जुलै रोजी दुपारी २: ३० ते ५: ३० या वेळात होणार असल्याची माहीती व शाळेच्या फलकावरही अशीच लेखी माहिती शाळेच्यावतिने लावण्यात आली होती. तसेच विनय तायडे नामक विद्यार्थ्याने परीक्षेचे वेळापत्रक या बाबत शिक्षकांना फोनव्दारे माहीती विचारली असता त्यांनी सुध्दा दुपारी २:३० वाजता इंग्रजी पेपर असल्याची माहीती दिली. त्यानुसार विद्यार्थी परीक्षा केंद्रावर गेले. तेव्हा पेपर सकाळी झाल्याचे माहीती केंद्र प्रमुखानी दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्राचार्य डि.एम.साबळे व घड्याळ तासीकाप्रमाणे शिकविणारे शिक्षक निलेश तिडके यांच्याविरूध्द कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
चुकीच्या माहितीमुळे बारावीच्या पुरवणी परीक्षेपासून विद्यार्थी वंचित
By admin | Updated: July 13, 2016 19:28 IST