शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

गावांचे नामफलक नसल्याने गैरसोय

By admin | Updated: May 17, 2016 02:46 IST

निसर्गसौंदर्यामुळे सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या नाणे मावळकडे पर्यटकांचा ओढा वाढलेला आहे.

करंजगाव : निसर्गसौंदर्यामुळे सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या नाणे मावळकडे पर्यटकांचा ओढा वाढलेला आहे. मात्र, बहुतेक गावांत नामफलक नसल्याने पर्यटकांची गैरसोय होते. अनेकदा दिशाभूल होऊन त्यांचा वेळ वाया जातो.नाणे मावळातील जांभवली, थोरण, शिरदे,पाले नामा, उकसान, सोमवडी, भाजगाव, कोळवाडी, गोवित्री, उंबरवाडी, करंजगाव, साबळेवाडी, मोरमारवाडी, कांबरे, कोंडिवडे, नवीन उकसान, नाणोली, साई, वाऊड, कचरेवाडी, घोणशेत आदी गावांत नामफलक नसल्याने नवख्या माणसांना गावाचे नाव विचारावे लागते. प्रत्येक गावाचे नाव दर्शविणारे फलक प्रमुख रस्त्यावर किंवा गावाकडे जाणाऱ्या उपरस्त्यांवर असणे अपेक्षित आहे. जांभवली येथे काही अंतरावर कोंडेश्वर मंदिर, ढाक बहिरी, सोमवडी येथे टाटा धरण, उंबरवाडी येथे शिवकालीन वाघेश्वर मंदिर, गोवित्री येथे पशुवैद्यकीय दवाखाना, गोवित्री-साबळेवाडी फाटा येथे संत तुकाराम पादुका मंदिर, करंजगाव येथे कमळाचे प्राचीन तळे, शाळा, करंजगाव-कोंडिवडे यांच्या हद्दीतले परागमंदिर, उकसान येथे वडिवळे धरण, साईच्या डोंगरावरील पवनचक्क्या आहेत. इतर गावांमध्ये अनेक शाळा, दवाखाना, छोटे-मोठे उद्योग-व्यवसाय असून, येथे शिवकालीन मंदिरे मोठ्या संख्येने आहेत. सर्वांत महत्त्वाचे येथील डोंगर खूप उंच आहेत. झाडीही अत्यंत दाट आहे. धरण, नदी असल्यामुळे येथील जमीन सुजलाम् सुफलाम् आहे. त्यामुळे या परिसरात विशेषत: रविवारी पर्यटकांची गर्दी जास्त असते. वाहतूक सुरू असते. प्रवासी, पर्यटकांना प्रत्येक ठिकाणी विचारत पुढे जावे लागते. प्रशासनाने नामफलक बसवावेत, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)