शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अकार्यक्षम परिवहन व्यवस्थापक चले जाव

By admin | Updated: July 19, 2016 02:57 IST

ठाणे परिवहन सेवेचा (टीएमटी) बट्याबोळ ‘लोकमत’मध्ये प्रसिध्द होताच, त्याचे पडसाद सोमवारच्या परिवहन समितीच्या बैठकीतही उमटले.

ठाणे : ठाणे परिवहन सेवेचा (टीएमटी) बट्याबोळ ‘लोकमत’मध्ये प्रसिध्द होताच, त्याचे पडसाद सोमवारच्या परिवहन समितीच्या बैठकीतही उमटले. परिवहनच्या इतिहासात प्रथमच टीएमटीविरोधात लक्षवेधी मांडली गेली. कर्तव्यात कसूर करणाऱ्या, परिचालन आणि काटकसर करण्याऐवजी केवळ टीएमटीचा गाडा खोलात घालणाऱ्या परिवहन व्यवस्थापकांना शासनाकडे परत पाठवा, असा एकमुखी सूर या लक्षवेधीत उमटला. अखेर परिवहन सभापती दशरथ यादव यांनी सभापतींना शासनाकडे परत पाठविण्याचे आदेश पालिका प्रशासनाला दिले. विशेष म्हणजे सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या सदस्यांनीही परिवहन आणि व्यवस्थापकांविरोधात आक्रमक भूमिका घेत परिवहनचा कारभार सुधारला नाही, तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करावे लागले असा इशारा दिला. परिवहन प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर बोट ठेवणारा वृत्तांत सोमवारच्या ‘लोकमत’मध्ये रिपोर्टर आॅन दि स्पॉट या शीर्षकाखाली प्रसिध्द झाला. त्याची दखल परिवहन समितीच्या सदस्यांनी घेतली. प्रसिध्द झालेल्या प्रत्येक मुद्द्याला धरुन सत्ताधारी सदस्यांसह विरोधकांनीही परिवहन प्रशासनाची चिरफाड केली. >टायर खरेदीत गैरव्यवहारभांडार विभागावर तर त्यांनी जाहीर आक्षेप नोंदवितांना येथे गैरव्यवहार होत असल्याचे पुरावेच सभागृहासमोर सादर केले. टायर खरेदी करतांना त्याच्या बंद लिफाफ्याद्वारे निविदा काढल्या जातात. परंतु त्या अंतिम होतांना प्रत्येक निविदाकाराकडून आधीच दर मागिवले जातात आणि आपल्या पसंतीच्या ठेकेदारालाच भांडारपाल आणि व्यवस्थापकांच्या संगनमताने ठेका दिला जातो, असा जाहीर आरोप त्यांनी केला. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी आयुक्तांकडे एका पत्राद्वारे केली. त्यावर लेखा आणि वित्त विभागामार्फत चौकशीचे आदेशही सभापतींनी दिले.वाहकाला दोन तास ठेवले डांबून काही दिवसांपूर्वी सॅटीसवरील वाहकाला लघुशंकेसाठी रेल्वे हद्दीतील शौचालयात जावे लागले होते. परंतु त्याने सर्व पुरावे सादर करुन देखील त्याला २६१ रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आणि त्याला चक्क दोन तास डांबून ठेवत त्याचा मोबाईलही काढून घेण्यात आल्याचा मुद्दा भोर यांनी उघड केला. त्यामुळे वाहक आणि चालकांसाठी सॅटीसवरच शौचालयाची सुविधा उपलब्ध करुन देण्याच मागणी त्यांनी केली.