शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणच्या तहसीलदार कार्यालय परिसरात घाणीचे साम्राज्य

By admin | Updated: September 10, 2016 03:13 IST

सार्वजनिक स्वच्छतेवर भर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ आॅक्टोबर २०१४ पासून ‘स्वच्छ भारत’ अभियानाची मुहूर्तमेढ रोवली.

आकाश गायकवाड,

डोंबिवली- सार्वजनिक स्वच्छतेवर भर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ आॅक्टोबर २०१४ पासून ‘स्वच्छ भारत’ अभियानाची मुहूर्तमेढ रोवली. प्रत्येक सरकारी कार्यालयांमध्ये ही मोहीम राबवण्यात आली. या अभियानाचे नियंत्रण त्यात्या शहरांचे तहसीलदार तसेच महापालिकांवर सोपवण्यात आली आहे. मात्र, ऐतिहासिक कल्याण शहराच्या तहसीलदार कार्यालयाच्या परिसरातच घाणीचे साम्राज्य आहे. या परिसरात अनेक सरकारी कार्यालये आहेत. त्यातील कर्मचारी व येथे येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या परिसराची त्वरित स्वच्छता करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.कल्याण पश्चिमेला रेल्वेस्थानकानजीक तहसीलदार कार्यालय आहे. या कार्यालयाच्या परिसरात महात्मा फुले चौक पोलीस ठाणेही आहे. कार्यालयाच्या मागे कल्याण येथील पोलिसांचा सोनसाखळी चोरीप्रतिबंधक विभाग, गुन्हे अन्वेषण शाखा आदी कार्यालये आहेत. या कार्यालयांमध्ये दररोज कल्याण-डोंबिवली शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागातून महसुली तसेच पोलीस ठाण्याच्या कामांसाठी शेकडो नागरिक येतात. तहसील कार्यालयाच्या आवारात मागील बाजूस असलेल्या स्वच्छतागृहाची कित्येक दिवस स्वच्छताच करण्यात आलेली नाही. शौचालयात घाणीचे साम्राज्य आहे. त्यातील नळ, दरवाजेही तुटलेले आहेत. अनेकदा पाण्याअभावी नागरिकांची गैरसोय होते. अन्यत्र शौचालय नसल्याने नागरिक व कर्मचाऱ्यांना नाक दाबूनच शौचालयात जावे लागत आहे. काही जण तेथे आडोसा शोधून लघुशंका करत असल्याची तक्रार काही कर्मचाऱ्यांनी केली. त्यामुळे महिला त्रस्त आहेत.तहसील कार्यालयामागील बाजूस पोलिसांनी गुन्ह्यांमध्ये जप्त केलेल्या दुचाकी ठेवल्या आहेत. या गाड्या अनेक वर्षांपासून तेथे पडल्याने त्यांना गंज चढला आहे. या परिसरातील कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी कूलर व शुद्ध पाणी पिण्याची सुविधा नाही. त्यामुळे त्यांना बाटलीबंद पाणी विकत आणावे लागत आहे. कर्मचाऱ्यांना सायंकाळी व रात्री डासांच्या उपद्रवाला सामोरे जावेलागते. उंदीर आणि घुशींनी तर संपूर्ण कोपरे पोखरून काढले आहेत. सध्या पावसाळ्यात काही कार्यालयांत गळती लागली आहे. ओलाव्यामुळे भिंतींचेपापुद्रेनिघाले आहेत. तसेच कुबट दर्पामुळे कर्मचारी व अधिकारी आजारी पडत आहेत. कार्यालयातील अनेक महत्त्वाची कागदपत्रे खराब झाली आहेत. तहसीलदार कार्यालयाच्या परिसरातील घाण व दुर्गंधीमुळे पंतप्रधान मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाला एक प्रकारे हरताळच फासला गेला आहे. या कार्यालयाच्या आवारातच स्वच्छता नसेल, तर येथील अधिकारी शहराची काय स्वच्छता ठेवणार?- दीपक गुप्ता, विद्यार्थी.