शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

भाषा संचालनालयाला ‘पूर्णवेळ’ वाली नाहीच

By admin | Updated: June 9, 2017 05:22 IST

सरकार बदलल्यानंतर ‘मराठी’ला अच्छे दिन येणार असे आमिष दाखवणाऱ्या राज्य शासनाचा प्रत्यक्ष कारभार ‘बुरे दिन’ प्रमाणेच सुरू आहे.

स्नेहा मोरे । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सरकार बदलल्यानंतर ‘मराठी’ला अच्छे दिन येणार असे आमिष दाखवणाऱ्या राज्य शासनाचा प्रत्यक्ष कारभार ‘बुरे दिन’ प्रमाणेच सुरू आहे. सत्तेत आल्यानंतर मराठी भाषा विभाग कात टाकेल, मराठीला नवी उभारी मिळेल हे आता स्वप्नच राहिले आहे. राज्य शासनामार्फत नुकत्याच करण्यात आलेल्या बदल्यांमुळे पुन्हा एकदा भाषा संचालनालयाला ‘पूर्णवेळ’ वाली नसल्याचे उघड झाले आहे. भाषा संचालकपदी प्रतिनियुक्तीवर असणाऱ्या अधिकाऱ्याचा भार आता अवर सचिवांच्या खांद्यावर दिला असून मराठी भाषेला ‘अच्छे दिन’ नाहीच हे पुन्हा यातून दिसून आले आहे.मराठी भाषा विभागात भाषा संचालनालयातील भाषा संचालकपदी औरंगाबाद येथील शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयाच्या साहाय्यक प्राध्यापिका मंजडॉ.ुषा कुलकर्णी यांची प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात आली होती. मात्र ३० मे २०१५ ते ३१ मे २०१७ हा डॉ. कुलकर्णी यांच्या प्रतिनियुक्तीचा कार्यकाळ संपल्याने त्यांना आता अमरावती येथील शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेत साहाय्यक प्राध्यापक पदावर सेवेत रुजू होण्याविषयी नुकताच राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने अध्यादेश काढला आहे. यामुळे पुन्हा एकदा भाषा संचालनालयाचा कारभार मराठीभाषा विभागाचे अवर सचिव हर्षवर्धन जाधव यांच्याकडे देण्यात आला आहे. २०११ सालापासून आतापर्यंत भाषा संचालकाचे पद रिक्त आहे. २०११ साली नोव्हेंबर महिन्यात गौतम शिंदे यांनी ९-१० महिन्यांच्या कालावधीसाठी संचालकपद भूषविले होते. त्यानंतर मात्र भाषा संचालनालयाचा हा कारभार केवळ अतिरिक्त जबाबदारीवर सुरू ठेवला आहे. यापूर्वी २०१२ मध्येही भाषा संचालक, उपसंचालक, साहाय्यक भाषा संचालक, भाषा अधिकारी आदी पदांसाठीही उमेदवार न मिळाल्याने सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढण्यात आला होता. नच्यने काढण्यात आलेल्या अध्यादेशात दुरुस्तीनंतरही प्रशासकीय सेवेतील दीर्घ अनुभव असलेला, संस्कृत पदवीधर, अनुवादाचा किंवा परिभाषा कोश निर्मितीचा किंवा शब्दावली-शब्दकोश निर्मितीचा ७ वर्षांचा अनुभव असलेली व्यक्ती भाषा संचालकाच्या पदासाठी न मिळाल्याने २०१२मध्ये यात बदल करून अनुवादाचा अनुभव पाच वर्षांचा असावा, अशी अट शिथिल करण्यात आली होती. त्यानंतर जाहिरात दिल्यावरही एकही उमेदवार मिळाला नव्हता.>तावडेंचे दुर्लक्षचभाषा संचालनालयासाठी योग्य माणूस पाहिजे हे अजून सरकारला कळले नाही, हे मराठी भाषा विभागाचे मंत्री विनोद तावडेंचे अपयश आहे. यामुळे पुन्हा एकदा सरकारची मराठीप्रतिची उदासीनता उघड झाली आहे. विभागाप्रति असणाऱ्या ढिसाळ कारभारामुळे हा विभाग इतिहासजमा होणार आहे. तावडेंच्या या दुर्लक्षित कारभारामुळे नागनाथ कोतापल्लेंपासून मराठी भाषा धोरणावर तयार झालेला मसुदा धूळ खात आहे. मराठी भाषेविषयीच्या सरकारच्या गंभीर अनास्थेमुळे भाषेची प्रगंती खुंटते आहे.- डॉ. दीपक पवार, मराठी अभ्यास केंद्रसप्टेंबर २००२ पासून ते आॅगस्ट २०१० पर्यंत भाषा संचालकपद भरलेले नव्हते. पदासाठी योग्य उमेदवार न मिळाल्यामुळे संचालकाचा प्रभार (कार्यासन २०-ब) च्या उपसचिवांकडेच दिला जात आहे.या उपसचिवांच्या बदल्या होत राहतात, अशा रीतीने गेल्या आठ वर्षांत सुमारे १२ वेळा भाषा संचालनालयाचे भाषा संचालक बदलले.