शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

क्लासेसचे संचालक संशयाच्या भोवऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2017 04:54 IST

पोलिसांनी उघडकीस आणलेल्या सैन्य भरती घोटाळ्याने स्पर्धा परीक्षांचे क्लासेस घेणारे संचालक संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

राजू ओढे,ठाणे-  पोलिसांनी उघडकीस आणलेल्या सैन्य भरती घोटाळ्याने स्पर्धा परीक्षांचे क्लासेस घेणारे संचालक संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. परीक्षार्थ्यांपर्यंत प्रश्नपत्रिका पोहोचवण्यात या क्लासेसचे संचालकही मुख्य भूमिकेत असल्याचे चित्र दिसत आहे.सैन्य भरती मंडळातर्फे २६ फेब्रुवारी रोजी लिपिक आणि ट्रेड्समनसह ४ पदांसाठी देशभरात घेतलेल्या लेखी परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी याप्रकरणी अटक केलेल्या २१ आरोपींमध्ये सैन्य दलाच्या ४ आजीमाजी कर्मचाऱ्यांसह स्पर्धा परीक्षेची शिकवणी घेणाऱ्या क्लासेसच्या संचालकाचाही समावेश आहे. या टोळीची काम करण्याची पद्धत अतिशय सूत्रबद्ध आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी किमान २/४ वर्षे संचालकांच्या संपर्कात असतात. त्यापैकी बौद्धिक क्षमता तुलनात्मकदृष्ट्या कमी आणि खर्च करण्याची क्षमता जास्त असलेले विद्यार्थी हे संचालक हेरतात.या घोटाळ्यातून या टोळीची एकूणच कार्यपद्धती स्पष्ट झाली आहे. प्रश्नपत्रिका परीक्षेच्या एक दिवस आधी हाती लागल्यानंतर टोळीच्या प्रमुखांनी ती नागपूर, पुणे आणि गोवा येथील त्यांच्या हस्तकांपर्यंत पोहोचवली. तत्पूर्वी इच्छुक परीक्षार्थ्यांसोबत खर्चाबाबत बोलणी झालेली होतीच. इच्छुक परीक्षार्थ्यांना परीक्षा केंद्राच्या जवळपास मोठी निवास व्यवस्था असलेल्या ठिकाणी एक दिवस आधी एकत्र करण्यात आले होते. खबरदारी म्हणून सर्व परीक्षार्थ्यांनाचे मोबाइल फोन आणि त्यांच्या शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या मूळ प्रती टोळीतील सदस्यांनी स्वत:च्या ताब्यात घेतल्या होत्या. त्यानंतर, सर्व परीक्षार्थ्यांनाना वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या प्रश्नपत्रिकेच्या प्रती (उत्तरासह) देण्यात आल्या. परीक्षार्थ्यांनी त्याचा पूर्ण अभ्यास केल्यानंतर त्यांची झोपण्याची व्यवस्था तिथेच करण्यात आली. येथून बाहेर पडण्याची परवानगी परीक्षार्थ्यांना देण्यात आली नव्हती. परीक्षा केंद्रांवर जाण्यास किती वेळ लागतो, याचा अंदाज घेऊन परीक्षार्थ्यांना सोडण्यात आले. परीक्षार्थ्यांच्या शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या मूळ प्रती त्याची अंतिम निवड होईपर्यंत त्याला परत दिल्या जात नाहीत. आरोपींकडून एवढी खबरदारी घेतली जात असल्याने वर्षानुवर्षे हा घोटाळा बिनदिक्कतपणे सुरू होता, अशी माहिती तपासातून समोर येऊ लागली आहे.