शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सर्व घटकांचा भ्रमनिराश करणारा दिशाहीन अर्थसंकल्प - अशोक चव्हाण

By admin | Updated: March 18, 2017 20:03 IST

अर्थसंकल्प सर्वच घटकांचा भ्रमनिरास करणारा असून दिशाहीन आणि शेतकरीविरोधी असल्याची टीका अशोक चव्हाण यांनी केली आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 18 - 'अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडला आहे पण कोणत्याही ठोस योजना नाहीत. शेतक-यांना कर्जमाफी न देता वा-यावर सोडले आहे. हा अर्थसंकल्प सर्वच घटकांचा भ्रमनिरास करणारा असून दिशाहीन आणि शेतकरीविरोधी असल्याची', टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे.
 
'अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज साडेचार हजार कोटीपेक्षा जास्तीच्या तुटीचा अर्थसंकल्प मांडला आहे. सलग तिस-या वर्षी सरकारने तुटीचा अर्थसंकल्प मांडला आहे या वरून या सरकारला आर्थिक शिस्त नसून राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यात सरकार अपयशी ठरल्याची टीका', अशोक चव्हाण यांनी केली आहे. 'यंदा चांगला पाऊस झाल्याने शेतक-यांना चांगले उत्पादन झाले होते, मात्र शेतीमालाला भाव मिळत नसल्याने मोठ्या संकटात असलेल्या शेतक-यांसाठी सरकार कर्जमाफीची घोषणा करेल अशी अपेक्षा होती. पण सरकारने राज्यातील शेतक-यांची फसवणूक केली आहे. नोटबंदीमुळे अडचणीत आलेल्या शेतकरी, छोटे व्यापारी, शेतमजूर, कामगार यांना दिलासा देण्यासाठी सरकार काही उपाययोजना करेल अशी अपेक्षा होती पण अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी राज्यातील जनतेचा अपेक्षाभंग केला',  असे चव्हाण म्हणाले.   
 
'तरूण, महिला, दलित, आदिवासी, अल्पसंख्याकांसाठी या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणांची आणि निधीची अपेक्षा होती. पण सरकारने या सर्व घटकांना निराश केले आहे. या अर्थसंकल्पात बेरोजगारी कमी करण्यासंदर्भात कुठलीही नवी योजना जाहीर केली नाही. महिला विकास आणि सुरक्षेसाठी या अर्थसंकल्पात कुठलीही ठोस उपाययोजना केली नाही. या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांच्या हातात काहीही पडले नसून राज्याला अधोगतीकडे नेणारा अर्थसंकल्प आहे', असं अशोक चव्हाण बोलले आहेत.