शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

थेट अनुदान योजनेला ‘अाधार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2016 05:08 IST

शासकीय योजनांचे अनुदान वैयक्तिक लाभार्थीच्या बँक खात्यात थेट जमा करताना लाभार्थ्यांचा आधार क्रमांक त्याच्याशी लिंक करा

मुंबई : शासकीय योजनांचे अनुदान वैयक्तिक लाभार्थीच्या बँक खात्यात थेट जमा करताना लाभार्थ्यांचा आधार क्रमांक त्याच्याशी लिंक करा, असे आदेश मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी शनिवारी येथे दिले.मुख्य सचिव आणि केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवालयातील सचिव संजय श्रीवास्तव यांनी शनिवारी डीबीटी योजनांच्या कार्यवाहीचा आढावा घेतला. महाराष्ट्रात २५३ विविध योजनांचे अनुदान आधार क्रमांकासोबत लिंक करून लाभार्थ्यांच्या खात्यात थेट जमा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे मुख्य सचिवांनी सांगितले. ३१ डिसेंबरपर्यंत डीबीटी प्रक्रियेशी आधार क्रमांक जोडण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे केंद्र सरकारचे निर्देश असल्याचे मुख्य सचिवांनी सांगितले.सध्या केंद्र शासनाच्या विविध विभागांच्या ७४ योजनांतर्गत डीबीटीच्या माध्यमातून लाभार्थ्यांना लाभ दिला जात आहे. राज्यामध्ये कृषी, पदुम, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, सार्वजनिक आरोग्य, सामाजिक न्याय, शालेय शिक्षण, आदिवासी आदी विविध विभागांमार्फत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट अनुदान जमा केले जाते. आता या लाभार्थ्यांचे बँक खाते आधार क्रमाकांशी लिंक करण्याची मोहीम सुरू असल्याचे मुख्य सचिवांनी सांगितले.आधार क्रमांक नोंदणीमध्ये महाराष्ट्राची ९१ टक्के एवढी कामगिरी झाली असून ० ते १५ वयोगटातील बालके, युवक-युवतींची आधार क्रमांक काढण्याची मोहीम सुरू आहे. राज्यात नवजात बालकांची आधार नोंदणीची मोहीमही हाती घेण्यात आली असून शासकीय आणि खासगी रुग्णालयांना या कामी ५०० टॅब देण्यात येणार असून अंगणवाडीतील बालकांच्या नोंदणीसाठी ३,९०० टॅब उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शाळांमध्येही आधार नोंदणीची मोहीम प्रभावीपणे सुरू असल्याचे मुख्य सचिवांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)>डीबीटीसाठी वित्त विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली डीबीटी सेल राज्यात स्थापन करण्यात आला आहे. तसेच डीबीटीमध्ये ज्या विभागांच्या योजनांचा जास्त समावेश आहे, अशा विभागांनीदेखील स्वतंत्र डीबीटी सेल सुरू करण्याचे निर्देश मुख्य सचिवांनी दिले. केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवालयाचे सहसचिव पीयूष यांनी डीबीटी प्रक्रियेबाबत सादरीकरण केले.