शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोशीतील तलावाची देखभाल महापालिका करणार

By admin | Updated: November 2, 2016 02:13 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तलाव म्हणजेच शांताराम तलावाची देखभाल आणि वीजपुरवठा करण्याची जबाबदारी महापालिकेने घेतली आहे.

मुंबई : मालाड पूर्वेकडील कुरारगाव येथील पश्चिम द्रुतगती मार्गाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तलाव म्हणजेच शांताराम तलावाची देखभाल आणि वीजपुरवठा करण्याची जबाबदारी महापालिकेने घेतली आहे. त्यामुळे सध्या खासगी संस्थेच्या ताब्यात असलेला हा तलाव आणि उद्यान लवकरच पालिकेच्या पी (उत्तर) विभाग कार्यालयाकडून ताब्यात घेतला जाईल. शिवाय तलावाचे दैनंदिन परिरक्षण व देखभालही महापालिका प्रशासन करणार आहे.विजेसाठी मीटर बसविण्याचे काम महापालिकेकडून पूर्ण झाले असून, येथील उद्यानातील व तलावातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आता सुरळीत होणार आहे. पुढील वर्षाच्या जानेवारी महिन्यात मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान संगोपनाच्या कामाच्या यादीत या उद्यानाचा समावेश केला आहे. त्यामुळे महापालिकेमार्फत या उद्यानाची सुरक्षा, वीज व परिरक्षण होणार आहे. तर चालू आर्थिक वर्षात महापालिका उद्यान मध्यवर्ती यंत्रणेमार्फत उद्यानाचे सौंदर्यीकरण, तलावाच्या पाण्याचे शुद्धीकरण व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भित्तीचित्र दर्शनी भागात बसविण्याचे काम केले जाईल, असे आमदार सुनील प्रभू यांनी सांगितले.दिंडोशीमधील नगरसेवकांसोबत महापालिका अधिकाऱ्यांचा पाठपुरावा केल्याने हा प्रश्न मार्गी लागल्याचे प्रभू यांनी सांगितले. ते म्हणाले की, महापालिकेने विजेची व्यवस्था करत दैनंदिन परिरक्षणाचे काम सुरू केल्याने बागेमध्ये विहार करणाऱ्या नागरिकांचा प्रश्न मार्गी लागला आहे. म्हाडामार्फत करण्यात आलेल्या शांताराम तलावाच्या बांधकामात काही दोष होते. त्यामुळे तलावातील पाण्याला दुर्गंधी येणे किंवा तलावातील मासे मरणे असे प्रकार घडत होते. मात्र यापुढे तलावाचे दुर्गंधीयुक्त पाणी दोषमुक्त करून स्वच्छ चांगले पाणी तलावात राहण्यासाठी फिल्टरेशन प्लांट बसवणे, तलावात आणि उद्यान परिसरात झाडांची लागवड व सौंदर्यीकरण करणे नादुरुस्त पाण्याचे कारंजे दुरुस्त करणे, तलावाची मालकी जिल्हाधिकाऱ्यांकडून मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरित करणे आणि तलावाची देखभाल व दुरुस्ती कायमस्वरूपी महापालिकेने करणे यासाठी मुख्यमंत्री व नगरविकास खात्याचे प्रमुख म्हणून फडणवीस यांकडे पाठपुरावा केला. (प्रतिनिधी)