शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

दिलीप पाटीदार ८ वर्षांपासून बेपत्ता

By admin | Updated: May 21, 2016 05:31 IST

मालेगाव बॉम्बस्फोटात संशयित म्हणून ताब्यात घेतलेले दिलीप पाटीदार गेल्या ८ वर्षांपासून बेपत्ता आहेत.

मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोटात संशयित म्हणून ताब्यात घेतलेले दिलीप पाटीदार गेल्या ८ वर्षांपासून बेपत्ता आहेत. त्यांच्या गायब होण्यामागे पाटीदार कुटुंबाने महाराष्ट्रातील दोन एटीएस अधिकारी असल्याचा संशय व्यक्त केला आहे. मात्र या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) राज्याच्या गृहमंत्रालयाच्या परवानगीची गरज आहे. दिलीप पाटीदार यांची पत्नी पद्मा यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली.पद्मा म्हणाल्या की, ११ नोव्हेंबर २००८ रोजी मध्य प्रदेशातून पाटीदार यांना महाराष्ट्र एटीएसने मालेगाव स्फोट प्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र त्यानंतर दिलीप पाटीदार यांचे काय झाले? याची कोणालाच माहिती नाही. त्यांचा शोध घेण्यासाठी पाटीदार कुटुंबाने मध्य प्रदेश उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयानेही सीबीआयला या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. सीबीआय तपासात महाराष्ट्र एटीएसचे काही अधिकारी दोषी असल्याचे समोर आले. त्यानंतर हे प्रकरण इंदूरच्या सीबीआय कोर्टापुढे गेले. मात्र महाराष्ट्र एटीएसच्या दोन अधिकाऱ्यांची चौकशी करण्यासाठी परवानगी मिळत नसल्याच्या कारणास्तव सीबीआयनेही या प्रकरणात हात झटकले. तपासाला गती मिळावी म्हणून पाटीदार कुटुंबाने गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. महाराष्ट्र एटीएसच्या त्या दोन अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची परवानगी गृहविभागाने द्यावी, अशी त्यांची मागणी होती. तत्काळ मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली नाही, तर पुन्हा सीबीआय कोर्टात जाण्याचा इशारा दिलीप पाटीदार यांचे भाऊ रामस्वरूप पाटीदार यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)>खुनाचा संशयएटीएस अधिकाऱ्यांनी दिलीप यांचा खून केल्याचा आरोप रामस्वरूप यांनी व्यक्त केला आहे. ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीत रामस्वरूप म्हणाले की, २००८ साली एटीएसने दिलीपला ताब्यात घेतले. त्या वेळी आठवड्याभरात दिलीपसोबत दोनदा फोनवर बोलणे झाले. काही सेकंदाच्या त्या संवादात दिलीपने केवळ एटीएससोबत मुंबईत असल्याचे सांगितले.मात्र त्या वेळी त्याच्या आवाजातून तो घाबरलेला असल्याचे जाणवले. मात्र दुसऱ्या आठवड्यानंतर त्याच्याशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही. त्या वेळी पोलिसांनी विचारणा केली असता दिलीप निर्दोष असल्याचे समजताच त्याला मुंबईतून मध्य प्रदेशसाठी ट्रेनमध्ये रवाना केल्याचे उत्तर मिळाले. मात्र पोलिसांच्या या उत्तरावर विश्वास नसून त्यांनीच दिलीपचे काही बरे-वाईट केल्याचा आरोप रामस्वरूप यांनी केला आहे.