शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
4
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
5
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
6
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
7
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
8
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
9
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
10
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
11
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
12
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
13
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
14
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
15
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
16
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
17
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
18
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
19
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
20
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी दिलीप म्हैसेकर

By admin | Updated: February 8, 2016 04:09 IST

नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. दिलीप गोविंदराव म्हैसेकर यांची नियुक्ती करण्यात आली.

मुंबई : नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. दिलीप गोविंदराव म्हैसेकर यांची नियुक्ती करण्यात आली. राज्यपाल आणि कुलपती चे. विद्यासागर राव यांनी, रविवारी निवड समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर, डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या नावाची घोषणा केली. ही नियुक्ती पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी आहे.डॉ. अरुण जामकर यांचा कार्यकाळ २० डिसेंबर रोजी संपल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. एकनाथ डवळे प्रभारी कुलगुरू म्हणून या पदाचा कार्यभार सांभाळीत होते. राज्यपालांनी कुलगुरू निवडीसाठी दिल्लीच्या एम्स येथील प्रो. डॉ. निखिल टंडन यांच्या अध्यक्षतेखाली शोधसमिती गठीत केली होती. समितीने शिफारस केलेल्या सर्व उमेदवारांच्या मुलाखती रविवारी राजभवन येथे झाल्या. त्यानंतर डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.डॉ. दिलीप म्हैसेकर (जन्म १२ जुलै १९६०) यांनी १९८४ साली औरंगाबादच्या शासकीय महाविद्यालयातून एमबीबीएस ही पदवी प्राप्त केली, तर १९८९ साली मुंबईच्या जी. एस. वैद्यकीय महाविद्यालयातून (क्षयरोग व छातीचे विकार) या विषयात एमडी केले. म्हैसेकर यांना अध्यापन, संशोधन व प्रशासनाचा व्यापक अनुभव असून, त्यांचे संशोधन निबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रकाशनात प्रसिद्ध झाले आहेत. सध्या ते नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालचे प्रभारी अधिष्ठाता, तसेच पल्मोनरी मेडिसिन विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते.