शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

दिलीप कुमार यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान

By admin | Updated: December 14, 2015 02:49 IST

बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते पद्मविभूषण पुरस्काराने रविवारी सन्मानित करण्यात आले.

मुंबई : बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते पद्मविभूषण पुरस्काराने रविवारी सन्मानित करण्यात आले. वांद्रे पाली हिल येथील त्यांच्या निवासस्थानी हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. या प्रसंगी दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानूही उपस्थित होत्या. त्या क्षणी भावुक झालेल्या सायरा बानू यांनी दिलीप कुमार यांच्या कपाळाचे चुंबन घेत त्यांचे अभिनंदन केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार अ‍ॅड. आशिष शेलार उपस्थित होते. दिलीप कुमार यांचा शुक्रवारी, ११ डिसेंबर रोजी ९३ वा वाढदिवस साधेपणाने साजरा करण्यात आला. चेन्नई येथील पूर परिस्थितीमुळे हा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. पद्मविभूषण पुरस्कारांची घोषणा प्रजासत्ताक दिनी करण्यात आली होती, पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे तो पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते स्वीकारण्यासाठी त्यांना दिल्लीतील समारंभाला जाता आले नव्हते. ‘लोकमत’ने यापूर्वी त्यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. ‘महाराष्ट्रीयन आॅफ द इअर’ या पुरस्कार सोहळ्यात तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते सन्मानित केले होते. (प्रतिनिधी)