शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

‘ध्येय पूर्णत्वासाठी परिश्रम अत्यावश्यक’

By admin | Updated: March 3, 2017 04:14 IST

आपल्या आयुष्यातील ध्येय, संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी कठीण परिश्रम करणे अत्यावश्यक आहे

ठाणे : आपल्या आयुष्यातील ध्येय, संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी कठीण परिश्रम करणे अत्यावश्यक आहे. केवळ शैक्षणिक दर्जा न उंचावता भावनात्मक आरोग्य जपत मुलांचा संपूर्ण विकास साधला पाहिजे, असे मत कल्याण सिटीजन एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्त आणि कुमारमंगलम बिर्ला यांची पत्नी नीरजा बिर्ला यांनी व्यक्त केले.कल्याणच्या बिर्ला स्कूलमध्ये मंगळवारी रंगलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाला त्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. या वेळी त्यांनी शैक्षणिक संस्थेचा आढावा घेऊन संस्थेच्या प्रगतीचे मूल्यांकन केले. तसेच शालेय जीवनावर आधारित मांडण्यात आलेले प्रदर्शन पाहिले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा त्यांनी आनंद घेऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. बिर्ला महाविद्यालयाला दिलेल्या भेटीत नीरजा बिर्ला यांनी पदवीधरांच्या दीक्षान्त सोहळ्याचे अध्यक्षपद भूषवले. २०१५-२०१६ च्या पदवीधरांना त्यांच्या हातून पदवी प्रदान करण्यात आली. या वेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी जीवनात जिज्ञासा, धाडस, दृढविश्वास, जिद्द आणि संकल्प हे गुण अंगी असणे कसे गरजेचे आहे, हे पटवून दिले. हेन्री फोर्ड यांचे उदाहरण देऊन आपल्यासाठी या विश्वाने जे केले, त्यापेक्षा जास्त आपण या विश्वासाठी करावे, हेच खरे यश आहे, असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. (प्रतिनिधी)>बिर्ला महाविद्यालयात दीक्षान्त सोहळ्यात पदवीधर विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करताना नीरजा बिर्ला.