शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
4
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
5
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
6
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
7
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
8
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
9
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
10
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
11
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
12
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
13
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
14
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
15
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
16
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
17
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
18
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
19
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
20
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!

दिलबहार ‘अ’कडे ‘अस्मिता चषक’

By admin | Updated: January 22, 2015 00:10 IST

सचिन पाटील ‘मालिकावीर’ : पाटाकडील ‘अ’चा टायब्रेकरवर ४-२ ने पराभव

कोल्हापूर : फुटबॉलरसिकांची क्षणा-क्षणाला उत्कंठा वाढविणाऱ्या आक्रमक चाली आणि कोण विजयी होणार याची अटकळ बांधणे कठीण असलेल्या अटीतटीच्या सामन्यात दिलबहार तालीम मंडळ ‘अ’ने पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’चा टायब्रेकरवर ४-२ असा पराभव करत अस्मिता चषक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. शाहू स्टेडियम येथे बुधवारी दिलबहार ‘अ’ विरुद्ध पाटाकडील ‘अ’ यांच्यात अंतिम सामना झाला. दिलबहार ‘अ’च्या अनिकेत तोरस्कर याने सामन्याच्या पहिल्या दहा मिनिटांत डी बाहेरून मिळालेल्या फ्री कीकवर मारलेला फटका पाटाकडील ‘अ’चा गोलरक्षक शैलेश पाटील याने लीलया अडविला. पुढच्याच क्षणी ‘दिलबहार’च्याच माणिक पाटीलचा फटका गोलपोस्टवरून गेला. पाटाकडील ‘अ’कडून दीपक थोरात, सैफ हकिम, रूपेश सुर्वे यांनी बचावफळीत उत्कृष्ट कामगिरी केली, तर गोलरक्षक शैलेश पाटील याने पूर्वार्धात दिलबहार ‘अ’चे आक्रमणाचे सत्र एकहाती किल्ला लढवत थोपविले. दोन्हींकडून गोल न झाल्याने पूर्वाध गोलशून्य बरोबरीत राहीला. उत्तरार्धात पाटाकडील ‘अ’च्या हृषीकेश मेथे-पाटील व अक्षय मेथे-पाटील, उत्सव मरळकर, रूपेश सुर्वे यांनी दिलबहार‘अ’च्या गोलक्षेत्रात गोल करण्यासाठी धडक मारण्याचे सत्रच आरंभले. मात्र, दिलबहार ‘अ’चा गोलरक्षक शोएब शेख याने पाटाकडील ‘अ’चे हल्ले परतावून लावले. दोन्ही संघांकडून पूर्ण वेळेत गोल न झाल्याने अखेर मुख्य पंच सूर्यदीप माने यांनी सात मिनिटांचा जादा वेळ दिला. पहिल्या सात मिनिटांत दिलबहार ‘अ’च्या मुज्जफर अन्सारी याने मिळालेल्या फ्री कीकवर मारलेला फटका थेट गोल जाळ्यात गेला. मात्र, लाईन रेफ्री सुनील पोवार यांनी आॅफसाईडचा सिग्नल दाखविला. त्यामुळे दिलबहार ‘अ ’च्या खेळाडूंची निराशा झाली. पाटाकडील ‘अ’कडून हृषीकेश व अक्षय मेथे-पाटील या बंधूंनी शेवटच्या काही क्षणांत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. अखेर सामना गोलशून्य बरोबरीत राहिल्याने पंचांनी टायब्रेकरचा अवलंब केला. त्यामध्ये दिलबहार ‘अ’कडून सनी सणगर, सचिन पाटील, अनिकेत जाधव, माणिक पाटील यांनी, तर पाटाकडील ‘अ’कडून सैफ हकीम, अक्षय मेथे-पाटील यांचे गोल झाले तर उत्सव मरळकर, संजय चिले यांचे फटके वाया गेल्याने सामना दिलबहार ‘अ’ ने ४-२ असा जिंकला. बक्षीस समारंभ छत्रपती संभाजीराजे व वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष छत्रपती मालोजीराजे यांच्या हस्ते झाला. यावेळी स्पर्धा समिती अध्यक्ष अरुण नरके, अजित खराडे, नगरसेवक संभाजी जाधव, बबन कोराणे, पोलीस निरीक्षक सुरेश मगदूम, दिनकर मोहिते, पोलीस उपअधीक्षक यशवंत केडगे, माणिक मंडलिक आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) प्रतिस्पर्धी संघांच्या समर्थकांना गुलाबपुष्पदिलबहार ‘अ’ व पाटाकडील ‘अ’ हे पारंपरिक प्रतिस्पर्धी संघ असल्याने संयोजकांतर्फे दोन्ही संघांच्या कर्णधारांना प्रतिस्पर्धी समर्थकांना गुलाबपुष्प देण्याची विनंती केली. त्यानुसार दिलबहार ‘अ’कडून सचिन पाटील, तर पाटाकडील ‘अ’कडून शैलेश पाटील यांनी प्रतिस्पर्धी समर्थकांच्या गॅलरीत मैदानातून गुलाबपुष्प दिले.लढवय्ये खेळाडू ‘स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू’ म्हणून १४ खेळाडूंचा गौरव करण्यात आला. त्यामध्ये अक्षय पाटील (संध्यामठ), अर्जुन साळोखे (शिवनेरी), राहुल देसाई, प्रतीक बदामे (प्रॅक्टिस ‘ब’), आशिष चव्हाण (साईनाथ), निखिल कुलकर्णी (दिलबहार‘ब’), शुभम संकपाळ (पोलीस), कपिल साठे (खंडोबा), प्रतीक पोवार (बालगोपाल), तेजस जाधव (फुलेवाडी), सुमित घाटगे (प्रॅक्टिस), नियाज पटेल (पाटाकडील ‘अ’), वैभव राऊत (शिवाजी), जावेद जमादार (दिलबहार ‘अ’). स्पर्धेतील उत्कृष्ट हृषीकेश मेथे-पाटील (पाटाकडील)- बेस्ट फॉरवर्ड , माणिक पाटील (दिलबहार) बेस्ट हाफ, उत्सव मरळकर (पाटाकडील)- बेस्ट डिफेन्स, शोएब शेख (दिलबहार)- बेस्ट गोलकीपर, सचिन पाटील (दिलबहार )- मालिकावीर. यांना प्रत्येकी तीन हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह देण्यात आले. अस्मिता चषक विजेता दिलबहार ‘अ’च्या संघातील खेळाडूंनी मैदानात फेरी मारून प्रेक्षकांचे आभार मानले, तर दुसऱ्या छायाचित्रात अस्मिता चषक फुटबॉल स्पर्धेच्या विजेतेपदाचा चषक छत्रपती संभाजीराजे व युवराज मालोजीराजे यांच्या हस्ते स्वीकारताना दिलबहार तालीम मंडळ ‘अ’ संघ. सोबत अरुण नरके, अजित खराडे, नगरसेवक संभाजी जाधव, बबन कोराणे, पोलीस निरीक्षक सुरेश मगदूम, दिनकर मोहिते, पोलीस उपअधीक्षक यशवंत केडगे, आदी उपस्थित होते.