मुंबई : विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना भूसंपादनाबाबत १३ मार्च २०१५ रोजी अधिसूचना काढल्याबद्दल काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात बुधवारी विधान परिषदेत हक्कभंगाचा प्रस्ताव दिला.अधिवेशन काळात अधिसूचना काढण्याची पद्धत नसताना १३ मार्च २०१५ रोजी भूसंपादन विधेयकात दुरुस्ती करणारी अधिसूचना काढण्यात आली. अशी अधिसूचना काढण्यापूर्वी सभागृहाला विश्वासात घेतले नाही. त्यामुळे आपण देत असलेला हक्कभंग प्रस्ताव सभागृहाने मान्य करावा, अशी विनंती ठाकरे यांनी केली. याबाबत सभापतीच निर्णय घेतील, असे तालिका सभापतींनी स्पष्ट केले. काँग्रेसने दिलेल्या या प्रस्तावावर आता गुरुवारी सभापती काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. (विशेष प्रतिनिधी)
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग
By admin | Updated: April 9, 2015 04:33 IST