शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात महायुती अशक्य दिग्विजय सिंग यांची स्पष्टोक्ती

By admin | Updated: May 18, 2016 20:55 IST

राज्यात गोवा फॉरवर्ड पक्षाला घेऊन महाआघाडी स्थापन करणे नजीकच्या भविष्यकाळात तरी शक्य नाही. त्यामुळे आमदार विजय सरदेसाई यांनीच काँग्रेस पक्षात परतावे,

पणजी : राज्यात गोवा फॉरवर्ड पक्षाला घेऊन महाआघाडी स्थापन करणे नजीकच्या भविष्यकाळात तरी शक्य नाही. त्यामुळे आमदार विजय सरदेसाई यांनीच काँग्रेस पक्षात परतावे, असे मत काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस व गोव्याचे प्रभारी दिग्विजय सिंग यांनी बुधवारी येथे व्यक्त केले. चर्चिल आलेमाव यांना काँग्रेस प्रवेश हवा असेल, तर न्यायालयात अगोदर त्यांचे निर्र्दोषत्व सिद्ध व्हावे, असे ते म्हणाले.दिग्विजय सिंग व चेल्लाकुमार गुरुवारी गोव्यात दाखल झाले. येथील चेंबर आॅफ कॉमर्सच्या सभागृहात या दोन्ही नेत्यांनी काँग्रेसच्या राज्य कार्यकारिणी बैठकीस मार्र्गदर्शन केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना दिग्विजय सिंग म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसमधील कुणी नेते काँग्रेसमध्ये परतत असतील, तर आम्ही त्यांचे स्वागतच करू. वास्तविक शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याची ही वेळ आहे. गोव्यात महाआघाडी शक्य दिसत नाही. त्यामुळे विजय सरदेसाई यांनी काँग्रेसमध्ये परतावे. चर्चिल आलेमाव यांनी काँग्रेस प्रवेशासाठी अर्ज केलेला नाही; पण ते मला भेटले होते. त्यांच्याविरुद्ध लुईस बर्जर लाच प्रकरणी न्यायालयात आरोपपत्र आहे. अगोदर न्यायालयात त्या खटल्याचा निकाल लागू द्या, असे मी चर्चिलना सांगितले आहे.दिग्विजय सिंग यांनी आम आदमी पक्षाविषयी बोलताना सांगितले की, हा पक्ष गोव्यात काँग्रेसच्या पारंपरिक मतदारांना स्वत:कडे ओढू पाहत आहे. ‘आप’ म्हणजे भाजपची ‘बी-टीम’ आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ते सिद्ध केले आहे. (खास प्रतिनिधी)प्रतिमा पाहून तिकीटगोवा विधानसभा निवडणुकीविषयी बोलताना दिग्विजय सिंग म्हणाले की, गोव्यातील काँग्रेसमध्ये जुने व नवे असा वाद नाही. आम्ही युवकांनाही प्रोत्साहन देऊ; पण त्यांना निवडणुकीवेळी किती टक्के जागा दिल्या जातील, ते आम्ही सांगू शकणार नाही. तिकीट वाटप करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया आम्ही आता सुरू करत आहोत. अशावेळी इच्छुक उमेदवाराची कार्यक्षमता, प्रतिमा आणि जिंकण्याची क्षमता विचारात घेतली जाईल. आम्ही काँग्रेसच्या प्रत्येक गट समितीला प्रत्येक मतदारसंघातून तीन इच्छुक उमेदवारांची नावे पक्षाकडे पाठविण्यास सांगू. ही नावे मग जिल्हा समितीकडे पाठविली जातील व त्यानंतर तिकीट वाटपाची पुढील प्रक्रिया पार पडेल.