नाशिक जिल्ह्यातील ओढा हे म्हणायला अवघ्या तीन ते साडेतीन हजार लोकवस्तीचे गाव, पण येथील ८० टक्के रहिवासी तसेच ९० टक्के व्यावसायिक स्मार्टफोनचा वापर करतात. इतकेच नव्हे, येथला एक चहा व वडापाववाला पे-टीएमद्वारे चहाचे पैसे स्वीकारतो तर ग्रामपंचायतीने शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी थेट ‘वॉटर एटीएम’ लागू करून ‘डिजिटल इंडिया’चे स्वप्न साकार करण्यासाठी आपले पाऊल पुढे टाकले आहे. जिल्ह्यातील ज्या सात गावांची जिल्हा प्रशासनाने ‘कॅशलेस’ गावे बनविण्यासाठी निवड केली आहे त्यात ओढा गावाचा समावेश करण्यात आला आहे. गाव : ओढाजिल्ह्याच्या ठिकाणापासूनचे अंतर : १४ किमी लोकसंख्या : ३३२१बँकांची एकूण संख्या : ०पोस्ट आॅफिस : आहे एटीएमची संख्या : ०वाहतूक सुविधा : एसटी /खासगी बस चोवीस तास उपलब्धइंटरनेट सुविधा : आहेकनेक्टिव्हिटी : काही प्रमाणात अडथळेवीजपुरवठा : अखंड. उन्हाळ्यात काही तास भारनियमनकॅशलेस आणि डिजिटल व्यवहार - किरकोळ व्यवहारही कॅशलेसदोन महिन्यांत डिजिटल व्यवहार / कॅशलेस व्यवहार वाढले आहेत का? -हो. काही प्रमाणात80%स्मार्टफोनधारक 75%साक्षरता50%कॅशलेस व्यवहार गाव कॅशलेस करण्यासाठी लहान-मोठ्या विक्रेत्यांची ग्रामपंचायतीत बैठक झाली. शंभर रूपयांच्या आतील किरकोळ व्यवहारासाठी कॅशलेसचा प्रयत्न थोडा अडचणीचा वाटतो. सर्व व्यावसायिक व्यवहारासाठी स्वॅप मशीन घेणार आहेत.- गोपाळ पेखळे, शिवकृपा वडापाव सेंटरबॅँकेत खाते नाही, मात्र उघडणार आहे. पाच ते दहा रूपयांसाठी स्वॅप मशीनचा वापर कोण करणार ? कॅशलेस गाव होण्यासाठी स्वॅप मशीन घेणार आहे. व्यवहाराची मर्यादा वाढणे महत्त्वाचे आहे.- शांताराम महाजन,जय बाबाजी भाजीपाला सेंटर गाव कॅशलेस होते आहे याचा आनंद वाटतोय.कॅशलेस व्यवहार सुरू झाल्यास अडचणी येणार नाहीत. मात्र कॅशलेससाठी सरकारने सुरक्षितता पुरविणे गरजेचे आहे. खातेदारांना तांत्रिक सुरक्षा पुरविणे गरजेचे आहे.- सुशीलभाई पटेल,शिवशक्ती स्टिल सेंटर्स हजार- दोन हजारांचा किरणा घेणारे स्वॅप करतील, पण पाच ते दहा रूपयांचा किराणा घेणाऱ्यांचे काय? काळाबरोबर बदलावेच लागेल अन्यथा आम्ही व्यवसायात मागे पडू.- नेमिचंद चोरडिया,चोरडिया किराणा दुकान कॅशलेस गावासाठी निवड केल्यानंतर ग्रामस्थांचे आधारकार्ड व भ्रमणध्वनी क्रमांक गोळा केले. सर्व ग्रामस्थांचे बॅँकेत खाते उघडण्यात आले आहे. ग्रामपंचायतीत स्वॅप मशीन बसविण्याचे प्रस्तावित आहे.- विनोेद वाक््चौर,ग्रामसेवक
ओढ्याची डिजिटल वाटचाल
By admin | Updated: January 1, 2017 03:16 IST