शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

संशोधनाला मिळणार ‘डिजिटल’ गती

By admin | Updated: March 14, 2017 07:57 IST

संशोधन प्रक्रियेत गती आणि अचूकता आणण्यासाठी पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स एज्युकेशन अ‍ॅन्ड रिसर्च (आयसर) या संस्थेत सुपर कॉम्प्युटर बसविला जाणार आहे.

पुणे : संशोधन प्रक्रियेत गती आणि अचूकता आणण्यासाठी पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स एज्युकेशन अ‍ॅन्ड रिसर्च (आयसर) या संस्थेत सुपर कॉम्प्युटर बसविला जाणार आहे. नॅशनल सुपरकॉम्प्युटिंग मिशनअंतर्गत देशात ७२ संस्थांमध्ये अशा प्रकारे सुपर कॉम्प्युटर बसविला जाणार असून, त्यातील पहिला कॉम्प्युटर ‘आयसर’ला मिळणार आहे. त्यामुळे पुणे व परिसरातील संशोधकांसाठी ही मोठी पर्वणी ठरणार आहे.केंद्र सरकारचा विज्ञान व तंत्रज्ञान विभाग आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विभागामार्फत देशात दोन वर्षांपूर्वी नॅशनल सुपर कॉम्प्युटिंग मिशनची सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये पुण्यात प्रगत संगणक विकास केंद्र (सी-डॅक)ची भूमिका महत्त्वाची असणार आहे. शैक्षणिक, संशोधन आणि विकासाच्या क्षेत्रामध्ये सुपर कॉम्प्युटिंगच्या माध्यमातून समन्वय साधणे, त्यांना एकत्रित आणणे, प्रगत संगणक क्षमता निर्माण करण्यासाठी हे मिशन महत्त्वपूर्ण आहे. याअंतर्गत देशात ठिकठिकाणी ७२ सुपर कॉम्प्युटर बसविले जाणार आहेत. त्याची क्षमता वेगवेगळी असणार आहे. हे सर्व संगणक एकमेकांशी संलग्न केले जाणार असल्याने शैक्षणिक व संशोधनासाठी भविष्यात मोठी संधी निर्माण होणार आहे. या साखळीतील पहिला सुपर कॉम्प्युटर पुण्यातील ‘आयसर’ या संस्थेत बसविला जाणार आहे. या संगणकाची क्षमता ५०० टेराफ्लॉप्स एवढी असून येत्या सप्टेंबर महिन्यापर्यंत संस्थेत बसविण्याचे उद्दिष्ट आहे.याबाबत अधिक माहिती देताना ‘आयसर’चे समन्वयक प्रा. अरविंद नातू म्हणाले, ‘‘सुपर कॉम्प्युटरसाठी आवश्यक सर्व सोयी-सुविधा सध्या आयसरमध्ये उपलब्ध आहेत. शास्त्रज्ञांची टीमही सज्ज आहे. त्यामुळे या संस्थेची निवड करण्यात आली आहे. त्यानंतर वाराणसी आणि खरगपूर येथील आयआयटीमध्ये हे संगणक बसविले जातील. त्याची क्षमता आणखी जास्त असणार आहे.’’(प्रतिनिधी)