शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल शाळा अभियान देशभर राबवा

By admin | Updated: May 3, 2017 03:52 IST

महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या १०० टक्के शाळा डिजिटल करण्यासाठी शिक्षण विभागाचे प्रयत्न प्रशंसनीय आहेत. मातृभाषेतून

ठाणे : महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या १०० टक्के शाळा डिजिटल करण्यासाठी शिक्षण विभागाचे प्रयत्न प्रशंसनीय आहेत. मातृभाषेतून शिक्षण दिल्याने मुलांची तंत्रज्ञान क्षमतादेखील विकसित होते. हे अभियान प्रधानमंत्र्यांच्या डिजिटल इंडियासाठी महत्त्वाचा सहभाग देणारे अभियान आहे. त्यामुळे ज्या वेळेला पंतप्रधानांना भेटेन तेव्हा डिजिटल शाळा हे अभियान संपूर्ण देशात राबविण्याची विनंती करणार असल्याचे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी भार्इंदर येथे केले.उत्तन येथे महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण आणि क्र ीडा विभाग व रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने डिजिटल शाळा अभियान राज्यस्तरीय प्रेरणा सभा मंगळवारी आयोजिली होती. त्या वेळी राज्यपाल बोलत होते. या वेळी शिक्षण व क्रीडामंत्री विनोद तावडे, खासदार विनय सहस्रबुद्धे, विश्वस्त अरविंद रेगे, शिक्षण सचिव नंदकुमार , कोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, हर्षल विभांडीक आदी उपस्थित होते. विभांडीक यांनी सुरू केलेले हे काम पाहून मी प्रभावित झालो आहे. विभांडीकने महाराष्ट्रात येऊन ब्रेन ड्रेनऐवजी ब्रेन गेन काम सुरू केले आहे. डिजिटल शाळेचा उपक्र म हा चांगला उपक्र म आहे. ग्रामपंचायतीला देण्यात येणाऱ्या प्रत्यक्ष निधीतून महाराष्ट्रातील गावे विकसित होत आहेत. मातृभाषेच्या शिक्षणामुळे मुलांची आकलनशक्ती वाढली आहे. आदिवासी भागात डिजिटल शाळा करण्याबरोबरच आरोग्याची काळजी, कुपोषणमुक्ती, शाळा सोडण्याचे प्रमाण कमी करण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. डिजिटल शाळा हा उपक्र म मी दत्तक घेतलेल्या शाळांतही राबविण्यात यावा, असे प्रतिपादन राज्यपाल यांनी या वेळी केले.सामान्य माणसाला काम करण्याची इच्छा असते. परंतु सक्षम नेतृत्व हवे असते. डिजिटल शाळांमध्ये सामाजिक सहभाग वाढविण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. इंग्रजी शाळेतील ४० टक्के विद्यार्थी आता जिल्हा परिषद शाळेकडे वळत आहेत. डिजिटल शाळेचा प्रयोग म्हणजे ओन युवर स्कूल असा प्रयोग आहे. या शाळेचा दुरुपयोग होणार नाही त्यासाठी कार्यपद्धती निश्चित केली पाहिजे. बदलत्या काळात अधिकाधिक शाळा डिजिटल होतील, यासाठी शिक्षण विभाग महत्त्वाची भूमिका बजावेल, असे तावडे यांनी या वेळी स्पष्ट केले. याप्रसंगी खासदार सहस्रबुद्धे यांनी या उपक्रमाची माहिती उपस्थितांना दिली. शिक्षण सचिव नंदकुमार यांनी समयोचित भाषण केले. हर्षल विभांडीक यांनी डिजिटल इंडिया ते न्यू इंडिया हा प्रवास असल्याचे या वेळी सांगितले. (प्रतिनिधी)अधिकाऱ्यांचा सत्कार  डिजिटल शाळा  उपक्र मात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ओमप्रकाश देशमुख, चंद्रकांत पुलकुंडवार, किशोर राजे निंबाळकर, मोहन देसले, उल्हास नारद, मीना यादव, अशोक पाटील आदी अधिकाऱ्यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.