शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अवघड गणित होणार रंजक!

By admin | Updated: May 2, 2017 04:14 IST

अभिनय, दिग्दर्शनाचे धडे देणारी फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया (एफटीआयआय) मुलांना सोप्या आणि

पुणे : अभिनय, दिग्दर्शनाचे धडे देणारी फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया (एफटीआयआय) मुलांना सोप्या आणि रंजक भाषेत गणिताचे धडेदेखील देणार आहे. रेडिओ एफटीआयआयच्या माध्यमातून तब्बल १८० भागांची मालिका मराठी भाषेतून करण्यात येणार असून, त्यात कागद, काच, कचरा वेचणारी मुलेच मुख्य भूमिका बजावणार आहेत.या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन एफटीआयआयचे संचालक भूपेंद्र कँथोला आणि कागद काच पत्रावेचक कष्टकरी पंचायतीच्या सामाजिक कार्यकर्त्या मैत्रेयी शंकर यांच्या हस्ते झाले.गणित विषयासंबधी प्रत्यक्ष लोकांच्या अडचणी काय आहेत, हे जाणून घेण्यासाठी ही गणित मालिका प्रामुख्याने तळागाळातील लोकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी करण्यात येणार आहे. केळेवाडी, जनता वसाहत, दांडेकर पूल या परिसरात पाहाणी करण्याचे काम शर्ली दीपक यांच्या मार्गदर्शनानुसार सुरू करण्यात आले आहे. या सर्वेक्षणानंतर ८ ते १४ मेदरम्यान कागद, काच पत्रावेचक कष्टकरी पंचायत तसेच दीपस्तंभ या संस्थांच्या मुलांना यानिमित्त प्रशिक्षण देण्याच्या कामाचीही सुरुवात होणार आहे. रोजच्या व्यवहारात आपल्याला गणिताचा कसा उपयोग होतो, हे विविध व्यवसायांमध्ये असलेल्या लोकांच्या उदाहरणाने स्पष्ट करण्यात येईल, असे प्रकल्पाचे संयोजक व रेडिओ एफटीआयआयचे संजय चांदेकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)