शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

महिला चालकांच्या रिक्षाला वेगळा रंग

By admin | Updated: January 13, 2016 02:01 IST

मुंबई महानगर क्षेत्रातील नूतनीकरण न झालेल्या तसेच रद्द झालेल्या ३५ हजार ६२८ रिक्षा परवान्यांचे आॅनलाइन लॉटरी पद्धतीने वाटप करण्यात आले. अंधेरी आरटीओतील सभागृहात आयोजित

मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रातील नूतनीकरण न झालेल्या तसेच रद्द झालेल्या ३५ हजार ६२८ रिक्षा परवान्यांचे आॅनलाइन लॉटरी पद्धतीने वाटप करण्यात आले. अंधेरी आरटीओतील सभागृहात आयोजित लॉटरी सोडतीचे उद्घाटन या वेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी महिला रिक्षा चालकांसाठी असणाऱ्या रिक्षांचा रंग काळा-पिवळ्यापेक्षा वेगळा ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला असल्याची माहिती रावते यांनी दिली. ही माहिती देतानाच एक लाख रिक्षा परवाने येत्या काही महिन्यांत उपलब्ध करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईतील रद्द झालेल्या रिक्षा परवान्यांची आॅनलाइन लॉटरी पद्धतीने मंगळवारी सोडत काढण्यात आली. त्या वेळी उद्घाटनप्रसंगी रावते यांनी महिलांसाठी आरक्षित असलेल्या कोट्यातील सर्व परवाने महिलांसाठी ठेवले जातील, अशी शाश्वती दिली. मुंबईत महानगर क्षेत्रात ३५ हजार ६२८ परवान्यांचे आॅनलाइन पद्धतीने लॉटरी सोडत काढण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासाठी १ लाख २९ हजार ५५५ अर्ज आले होते. यात ३३ हजार ८४७ पुरुष तर ४६५ महिला विजेत्या ठरल्याचे विभागाकडून सांगण्यात आले. परिवहन विभागाने महिलांसाठी ५ टक्के आरक्षण ठेवले आहे. या कोट्यातील जवळपास १,४00 परवाने शिल्लक राहिले असून, हे परवाने केवळ महिलांसाठीच आरक्षित राहतील, असे स्पष्ट केले. जाहीर झालेल्या लॉटरीमध्ये मुंबई महानगर क्षेत्रात रिना सॅम्युअल, वंदना घाडी, तृप्ती पोफळे आणि नूतन खळे यांचा पहिल्या ४ क्रमांकांमध्ये समावेश आहे. (प्रतिनिधी)रिक्षा-टॅक्सी चालकांना खडेबोल प्रवाशांना चांगली सेवा देण्याचे काम हे रिक्षा-टॅक्सी चालकांचे आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. त्यांच्याकडून चांगली सेवा दिली जाईल, अशी अपेक्षा असल्याचे मत रावते यांनी व्यक्त केले. मुंबई महानगर क्षेत्राव्यतिरिक्त पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर या शहरांतील महानगरपालिका क्षेत्रातील रद्द झालेल्या आॅटोरिक्षा परवान्यांचीही लॉटरी सोडत काढण्यात आली.