शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी, शिक्षकांच्या नात्यात दुरावा

By admin | Updated: July 12, 2014 23:10 IST

शिक्षकाविषयीचा आदर, दबदबा आणि भीती या सर्वच भावना हळूहळू लोप पावत असल्याचा निष्कर्ष लोकमतने केलेल्या पाहणीद्वारे समोर आला.

वाशिम : गुरुकुलाची परंपरा लाभलेल्या आपल्या समाजात शिक्षकाविषयीचा आदर, दबदबा आणि भीती या सर्वच भावना हळूहळू लोप पावत असल्याचा निष्कर्ष लोकमतने केलेल्या पाहणीद्वारे समोर आला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी घडविण्याच्या व्यापक विचारांना तिलांजली देत केवळ विषयापुरती चाकोरी आखुण घेतली आहे. तर विद्यार्थ्यांनाही केवळ परिक्षेत गुण मिळविण्यासाठी शिक्षकांची निकड भासत आहे. यातूनच या नात्यामधील दुरावा दिवसागणिक वाढत चालला आहे.१२ जुलैला सर्वत्र गुरूपोर्णिमेचा उत्सव साजरा झाला. त्याच पृष्ठभूमिवर विद्यार्थी व शिक्षक यांच्यातील नात्यातील ओलाव्याची स्थिती जाणू घेण्यासाठी लोकमतने एक सर्व्हेक्षण केले. यामध्ये लोकमतच्या चमूने महाविद्यालयीन विद्यार्थी, त्यांचे पालक व शिक्षकांशी संवाद साधला. या सर्व्हेक्षणात गुरू -शिष्यातील नात्यांची पकड काहीअंधी सैल झाल्याचे दिसून आले. वाढत्या विद्यार्थिसंख्येमुळं अनेक शाळांमध्ये दोन शिफ्टमध्ये अध्यापन चालतं. शिक्षक आपापल्या शिफ्टचा आणि विषयाचा विचार करतात; सर्वांगीण विद्यार्थिहिताचा विचार हळूहळू मागे पडत आहे, असा अनुभव आला. संस्कारक्षम वयात गुरुविषयी असलेला आदर पुढे क्रमश: घटत जातो ,असेही यातून पाहायला मिळाले. प्राथमिक शाळेत शिक्षक-विद्यार्थ्यांत नातं निर्माण होतं. गुरूची ओळख विद्याथ्यार्ला तेव्हा प्रथमच होत असल्यामुळं या कोवळ्या वयात या नात्यात ओलावा असतो. या वयात शिक्षकाशी जडलेलं नातं विद्यार्थी कायम जपतात. दहावी-बारावी पास झाल्यावर अनेक विद्यार्थी पहिल्या शिक्षकाला पेढे देतात. कुठेही भेटले, तरी आदरानं नमस्कार करतात. पूवीर्ची पाया पडण्याची पद्धत मागं पडली असली, तरी तोच आदर या शिक्षकाविषयी दिसतो.माध्यमिक शिक्षण घेताना ज्या विषयात रस असेल, त्या शिक्षकाशी हे नातं टिकून राहिल्याचा अनुभव येतो. बाकी विषय, विशेषत: अवघड विषय शिकविणार्‍या शिक्षकाशी व्यक्तिगत नातं निर्माण होत नसल्याचे सर्व्हेतून दिसून आले.