शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अधिवेशनाआधीच विरोधकांमध्ये फूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 05:34 IST

सोमवारपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असताना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या प्रमुख विरोधी पक्षांमध्येच फूट पडल्याचे चित्र अधिवेशनाच्या

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : सोमवारपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असताना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या प्रमुख विरोधी पक्षांमध्येच फूट पडल्याचे चित्र अधिवेशनाच्या पूर्वसंध्येस पाहायला मिळाले. त्यामुळे सत्ताधारी निश्चिंत झाले आहेत. सरकारच्या कारभारात ‘झोल’ असल्याचा आरोप करत, मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार घालण्याची घोषणा दोन्ही पक्षांनी स्वतंत्र पत्रकार परिषद घेत केली.अधिवेशनाच्या आदल्या दिवशी प्रथेप्रमाणे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षांच्या गटनेत्यांची बैठक बोलाविण्यात आली. त्यानंतर, विरोधी पक्षातील नेते संयुक्त पत्रकार परिषदेस संबोधित करणार होते. मात्र,  इंदिरा गांधी यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आधी घ्यायचा की शरद पवारांचा यावरुन झालेल्या मतभेदांमुळे राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे पत्रकार परिषद घेण्याची घोषणा केली. विखे-पाटील यांनी काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि जनता दल (युनायटेड) आदी पक्षांची तर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादीची प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या पत्रकार परिषदेला संबोधित केले. सरकारची कर्जमाफी योजना फसवी आहे. बँकांकडे असलेल्या आकडेवारीच्या आधारे कर्जमाफी देणे शक्य आहे. परंतु, सरकारने आता अर्ज वाटप करुन शेतक-यांची पात्रता निश्चित करण्याचा घाट घातला आहे. कर्जमाफीची घोषणा करण्यास विलंब झाल्याने शेतक-यांचा रोष कमी करण्यासाठी सरकारने या योजनेला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिले. पण प्रत्यक्षात शिवरायांच्या नावाखाली लोकांची फसवणूक सुरू असल्याचा आरोप विखे पाटील यांनी केला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मीलवरील स्मारक आणि अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम अजून पुढे गेलेले नाही. पण त्यांची नावे वापरून लोकांची दिशाभूल मात्र सुरूच असल्याचा आरोप विखे पाटील यांनी केला. शेतक-यांची सरसकट कर्जमाफी, शेतीमालालला हमीभाव, नेवाळे येथील शेतकरी आंदोलनात पॅलेट गनचा वापर आदी प्रश्नावर सरकारला धारेवर धरू. ‘राज्य सरकारचा सगळा कारभार गोल, गोल आहे. त्यात मोठा झोल आहे.’ त्यामुळे सरकारवर जनतेचा भरोसा राहिला नाही, अशी टीका धनंजय मुंढे यांनी राष्ट्रवादीच्या पत्रकार परिषदेत केली. ते एकत्र राहावेत ही टायपिस्टची इच्छा पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, विरोधकांमध्ये आम्ही फूट पाडलेली नाही. त्या फुटीचा आम्हाला फायदाही नको आहे. त्यांनी आयुष्यभर विरोधातच राहावे. आज दोन्ही पक्षांनी वेगवेगळी निवेदने माझ्याकडे पाठविली पण मजकूर अगदीच सारखा होता. म्हणजे ते एकत्र राहावेत ही टायपिस्टची इच्छा आहे, असा चिमटा त्यांनी काढला. विधिमंडळाचे सोमवारपासून पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला फडणवीस सरकारने सह्याद्री अतिथीगृह येथे चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. भाजप, शिवसेनेसह सर्व घटक पक्ष चहापान कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी भाजपा-शिवसेनचे मंत्री उपस्थित होते.