शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वातावरणातील फरक विध्वंसक

By admin | Updated: May 14, 2017 05:28 IST

वातावरणात अचानक होणारे बदल, हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यासारख्या गरमीचा अनुभव येणे, पावसाळ्याचा कालावधी बदलत असणे;

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वातावरणात अचानक होणारे बदल, हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यासारख्या गरमीचा अनुभव येणे, पावसाळ्याचा कालावधी बदलत असणे; या गोष्टी आपल्याला विध्वंसाकडे घेऊन जात आहेत. ठरावीक काळानंतर पडणारा दुष्काळ, शहरासह देशभरातले वाढत जाणारे तापमान आणि मोठ्या प्रमाणातील प्रदूषणसुद्धा येऊ घातलेल्या विध्वसंकतेला तितकेच पूरक आहे, असे प्रतिपादन मुंबई वेधशाळेचे उपसंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी केले.नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सांस्कृतिक सभागृहात शुक्रवारी ‘बदलते हवामान आणि यंदाचा पावसाळा’ या विषयावर आयोजित व्याखानात कृष्णानंद होसाळीकर बोलत होते. मुंबई विज्ञान परिषद आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कृष्णानंद होसाळीकर म्हणाले, हवामानाच्या भयंकर परिस्थितीला आपणच जबाबदार आहोत. आपणच सर्वत्र निसर्गाची हानी केली आहे. आपणच ग्लोबल वॉर्मिंग वाढवले आहे. मुंबईतली उष्णता वाढण्यामागेसुद्धा आपणच आहोत. आपण झाडे तोडली त्यात भर म्हणून सर्वांनी आपआपली घरे वातानुकूलित केली आणि बाहेरचे तापमान वाढवले. म्हणून शहरासह देशभरातील उष्णता वाढली आहे. २००२, २००५, २००९, २०१० आणि २००१६ ही आतापर्यंतची सर्वात उष्ण वर्षे होती. तर यंदाचा फेब्रुवारी महिना सर्वात उष्ण होता.यंदा देशासह महाराष्ट्रात ९६ टक्के पाऊस पडेल. मुंबईत मान्सून कधी दाखल होईल, हे सध्या सांगता येणार नाही. वेधशाळेच्या पुढील अभ्यासानंतर मान्सूनबद्दलची माहिती येत्या काळात देण्यात येईल.मुंबईत तर हिवाळा नसतोच. हाताच्या बोटांवर मोजता येतील इतके दिवस मुंबईतल्या हवेत थोडासा गारवा असतो; त्यालाच आपण मुंबईकर हिवाळा मानतो.>यंदाचा अपेक्षित पाऊस कोकण आणि गोवा - ९६ टक्केमध्य महाराष्ट्र - ९७ टक्केमराठवाडा - ९९ टक्केविदर्भ - ९६ टक्के