शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

डिझेल टँकर उलटला; चालकाचा जळून मृत्यू

By admin | Updated: June 13, 2017 14:06 IST

टायर फुटून चालकाचं नियंत्रण सुटल्याने जालन्यात डिझेल टँकर उलटल्याची घटना घडली आहे.

ऑनलाइन लोकमत

जालना, दि. 13-   टायर फुटून चालकाचं नियंत्रण सुटल्याने जालन्यात डिझेल टँकर उलटल्याची घटना घडली आहे. डिझेल टँकर विद्युत खांबाला धडकून ही घटना घडली आहे. या अपघातात ट्रकने पेट घेतल्यामुळे चालकाचा कॅबिनमध्येच जळून मृत्यु झाला आहे.तर एक जण जखमी झाला आहे. जालना औरंगाबाद रस्त्यावरील बारवाले महाविद्यालयाजवळ सोमवारी मध्यरात्री दीडवाजेच्या सुमारास ही घटना घडली.
 
मृत चालकाचं नाव रामकिसन वामन फड असून ते नांदेडमधील कंधारचे राहणारे आहेत. तसंच क्लीनर देवानंद देवराव नाईकवाडे ट्रकच्या बाहेर फेकला गेल्यामुळे त्यांचा जीव वाचला. अपघातग्रस्त टँकर मनमाडहून नांदेडकड़े जात होता. जालन्यातील बारवाले महाविद्यालयाजवळील एकता  हॉटेल समोर टँकरचं मागील टायर फुटलं. त्यामुळे चालक वामन फड यांचं नियंत्रण सुटून टँकर रस्त्याच्याकडेला असलेल्या उच्चदाबाच्या विद्युत खांबाला धडकला. वीजप्रवाह असलेला विद्युत खांब खाली पडल्यानं काही क्षणात टँकरने पेट घेतला. डिझेल गळतीमुळे आग भडकल्याने चालक फड यांना बाहेर पडता आलं नाही. त्यामुळे त्यांचा कॅबिनमध्येत जळून मृत्यू झाला. आगीवर निंयत्रण मिळविण्यासाठी जालना औरंगाबदच्या तीन अग्निशमन बंबला दोन तास लागले. या प्रकरणी चंदनझीरा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस उप निरिक्षक सी.जे. गिरासे तपास करत आहे.