शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

एसटीला डिझेल दरवाढीचे चटके

By admin | Updated: May 5, 2016 02:06 IST

एसटी महामंडळाला डिझेल दरवाढीचे चटके बसत आहेत. एप्रिल आणि मे महिन्यातील सलग तीन वेळा डिझेल दरवाढीमुळे एसटीला वर्षाला १८0 कोटींचा फटका बसणार आहे.

मुंबई : एसटी महामंडळाला डिझेल दरवाढीचे चटके बसत आहेत. एप्रिल आणि मे महिन्यातील सलग तीन वेळा डिझेल दरवाढीमुळे एसटीला वर्षाला १८0 कोटींचा फटका बसणार आहे. एसटी महामंडळाच्या राज्यात सुमारे १७ हजार बस धावतात. बहुतांश डिझेलवर बसेस धावत असून वर्षाला १२ लाख लिटर डिझेल एसटी महामंडळाला लागते. एसटी महामंडळाकडून एकूणच डिझेलवर वर्षाला २,४00 ते २,६00 कोटी रुपये खर्च केले जात आहेत. एसटीकडून होणाऱ्या खर्चात ३५ टक्के खर्च हा डिझेलवरच केला जातो. एप्रिल महिन्यात दोन वेळा आणि मे महिन्याच्या सुरुवातीला एकदा डिझेलच्या दरात वाढ झाली. या दरवाढीमुळे एसटी महामंडळाला यापुढे वर्षाला १८0 कोटी रुपयांचा फटका बसणार असल्याचा अंदाज एसटी महामंडळाकडून बांधण्यात आला आहे. एप्रिल महिन्यात झालेल्या दरवाढीमुळे महामंडळाला दररोज ६ कोटी ६0 लाख रुपये जादा मोजावे लागत आहेत. मे महिन्याच्या सुरुवातीपासूनही दरवाढ झाल्यामुळे आणखी प्रत्येक दिवशी ३६ लाख रुपयांची भर पडली आहे. १ आॅक्टोबर रोजी राज्य सरकारकडून डिझेलवर २ रुपये व्हॅट आकारण्यात आला आणि त्याच दिवशी केंद्राकडून ४९ पैसे प्रति लिटर दर वाढविण्यात आला. त्यानंतर १६ आॅक्टोबरपासून डिझेलच्या किमतीत ६२ पैसे प्रति लिटर वाढ करण्यात आली. १ नोव्हेंबरपासून ८४ पैसे प्रति लिटर वाढ केली आणि अर्धा टक्के स्वच्छता उपकरही आकारला. तर १६ नोव्हेंबरपासून ८९ पैसे दरवाढ झाली. या दरवाढीमुळे आणखी जादा आर्थिक भार सहन करावा लागत असतानाच त्यात पुन्हा एकदा १८0 कोटी रुपयांची भर पडणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)