ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15 - 2012 च्या महापालिका निवडणुकीत करुन दाखवलं आणि माझं नावं शिवसेना अशा प्रकरची घोषवाक्य घेऊन निवडणुक लढवली होती. विरोधकांनी याचा चांगलाच समाचार घेतला होता. विरोधकांनी उडवलेल्या हुर्येनंतर शिवसेने 2017 मध्ये तुम्हाला हे माहित आहे का असा नवा नारा आणला आहे.
शिवसेने पाच वर्षात केलेल्या कामाचा आढावा आणि यापुढे काय करणार आहे याचा लेखेजोखा मतदारापुढे मांडण्यासाठी डिड यु ने ह्या स्लोगनचा वापर करत बॅनर मुंबईतील रस्त्यावर, नाक्यावर झळकत आहेत. विरोधकांना शह देण्यासाठी आणि आपल्या विकास कामांचा लोकांना परिचय व्हावा यासाठी सेनेची पोस्टरबाजी नाक्यांवर झळकतायेत!