शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
3
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
4
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
5
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
6
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
7
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
8
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
9
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
10
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
11
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
12
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
13
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
14
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
15
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
16
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
17
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
18
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
19
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
20
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'

ऐकलं का...पहिल्यांदाच गावात एसटी आली!

By admin | Updated: August 10, 2016 04:50 IST

महासत्तेच्या दिशेने वाटचाल करताना देशात अजूनही अशी गावे आहेत की जिथे अजून एसटी बस पोहोचलेली नाही. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खरपुडी खुर्दमध्ये

दावडी (जि. पुणे) : महासत्तेच्या दिशेने वाटचाल करताना देशात अजूनही अशी गावे आहेत की जिथे अजून एसटी बस पोहोचलेली नाही. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खरपुडी खुर्दमध्ये मंगळवारी पहिल्यांदाच एसटी बस आली आणि गावकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला.खेड सारख्या प्रगतीशील तालुक्यापासून अवघ्या १२ किमी अंतरावर खरपुडी खुर्द आहे. गावाची लोकसंख्याही बाराशेच्या आसपास. गावात प्रती जेजुरी म्हणून ओळखले जाणारे एक खंडोबाचे मंदिर असून राज्यभरातून दरवर्षी भाविक मोठ्या संख्येने येथे येतात. परंतु आजतागायत गावात येण्यासाठी एसटीची सुविधा नव्हती. ग्रामस्थ, महिला, जेष्ठ नागरिक, वृद्ध व विद्यार्थी अशा साऱ्यांनाच जवळच्या शिरोली फाटा किंवा नदीपालिकडील खरपुडी बुद्रुक येथे जायचे असेल तर चार ते पाच किलोमीटर अंतराची पायपीट ठरलेली. ती अंगवळणीही पडलेली. एसटी बस सुरू होण्यासाठी ग्रामस्थांनी कित्येक वर्षांपासून मागणी होती. खंडोबा देवस्थान ट्रस्टीचे माजी अध्यक्ष संदिप गाडे, मल्हारी काळे व ग्रामस्थांनी राजगुरुनगर बसस्थानक प्रमुखाकडे पाठपुरावाही केला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले व पहिल्यांदा गावात एसटी आल्यानंतर ग्रामस्थ व विदयार्थ्यांनी जल्लोष केला. चालक व वाहक यांना महिलांनी औक्षण केले. ग्रामस्थांनी खंडोबा देवाची तळी भरुन या एसटी बसची पूजा केली. (वार्ताहर)