शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांच्या मंत्रिपदामुळे माझी गुणवत्ता कमी झाली का? बडोलेंच्या कन्येने शिष्यवृत्ती नाकारली , मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 04:33 IST

सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांची कन्या श्रुती हिला ब्रिटनमधील उच्च शिक्षणासाठी सामाजिक न्याय विभागाने दिलेल्या शिष्यवृत्तीमुळे वादळ निर्माण झाल्यानंतर आता ही शिष्यवृत्ती नाकारत असल्याचे एक भावनिक पत्र

विशेष प्रतिनिधी मुंबई : सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांची कन्या श्रुती हिला ब्रिटनमधील उच्च शिक्षणासाठी सामाजिक न्याय विभागाने दिलेल्या शिष्यवृत्तीमुळे वादळ निर्माण झाल्यानंतर आता ही शिष्यवृत्ती नाकारत असल्याचे एक भावनिक पत्र तिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज लिहिले.‘कुणाचाही हक्क मी कधीही डावलला नाही व डावलणारही नाही. वडील मंत्री आहेत म्हणून शिष्यवृत्तीवर वाद होत असेल आणि त्यामुळे माझी गुणवत्ता झाकोळली जाणार असल्याने मी व्यथित झाली आहे. त्यामुळे मी मला मंजूर झालेल्या शिष्यवृत्तीचा लाभ नम्रतापूर्वक नाकारत आहे,’ असे श्रुतीने या पत्रात म्हटले आहे.माझ्या वडिलांनी माझ्या भावाच्या परदेशातील शिक्षणासाठी कर्ज घेतले व त्याची परतफेड ते अजूनही करीत आहेत. जगातील पहिल्या शंभर विद्यापीठांमध्ये प्रवेश घेताना आर्थिक निकष लागू नाहीत हा माझ्या शिक्षणापूर्वीचा शासनाचा नियम आहे. त्यात मी पात्र असेल तर हा माझा दोष आहे का? माझे शिक्षण गुणवत्तेच्या आधारे झाले आहे. आता वडिलांच्या मंत्रिपदामुळे माझी गुणवत्ता कमी झाली का, असा सवाल श्रुतीने पत्रात केला आहे. जगातील पहिल्या ३० विद्यापीठांत असलेल्या मँचेस्टर विद्यापीठात मला पीएच.डी.साठी (खगोलशास्र व अंतराळ संशोधन) प्रवेश मिळाला आहे. मी हा अभ्यासक्रम पूर्ण करीनच. राज्याचे पालक म्हणून मी तुमची मुलगी आहे. आपल्या राज्यासाठी, देशासाठी, सावित्रीबाई व बाबासाहेबांचे स्वप्न साकार करण्यासाठी मी शिकणारच, असेही तिने पत्रात म्हटले आहे.समाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांचा मुलगा अंतरिक्ष यालाही विभागाची परदेशी शिक्षणासाठीची शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. त्याने मात्र ही शिष्यवृत्ती नाकारलेली नाही. ‘अंतरिक्षला नियमानुसार शिष्यवृत्ती मिळाली असल्याने ती नाकारण्याचा प्रश्नच नाही, अशी भूमिका वाघमारे यांनी घेतल्याचे समजते.‘त्या’ आदेशाचा फायदा बडोले यांच्या कन्येला-बडोले हेच सामाजिक न्याय मंत्री असताना त्यांच्या विभागाने १६ जून २०१५ रोजी असा आदेश काढला की पहिल्या शंभर रँकिंगच्या विद्यापीठात प्रवेश घेतल्यास पालकांच्या उत्पन्नाची अट नसेल. या आदेशाचा फायदा बडोले यांच्या कन्येला झाला आणि तिला नियमानुसारच शिष्यवृत्ती मिळाल्याचे सांगण्यास बडोले मोकळे झाले, असा आक्षेप आहे. १०१ ते ३०० रँकिंगच्या विद्यापीठात प्रवेश घेतलेल्यांच्या पालकांचे उत्पन्न ६ लाख रुपयांपेक्षा कमी असावे, अशी अट त्या आदेशात टाकण्यात आली. तत्पूर्वी सर्वच रँकिंगच्या विद्यापीठात प्रवेश घेणाºयांच्या पालकांसाठी उत्पन्नाची अट होती.