शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

दाऊदवर इतकी वाईट वेळ आली का?- राज ठाकरे

By admin | Updated: June 27, 2016 04:52 IST

खडसेंना फोन करावा, एवढी वाईट वेळ त्याच्यावर आली का, अशा शब्दात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी खडसे-दाऊद फोन प्रकरणाची खिल्ली उडवली

मुंबई : पाकिस्तानातून स्वत:ची सारी यंत्रणा चालविणाऱ्या दाऊदने महाराष्ट्रात एकनाथ खडसेंना फोन करावा, एवढी वाईट वेळ त्याच्यावर आली का, अशा शब्दात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी खडसे-दाऊद फोन प्रकरणाची खिल्ली उडवली. नुकतेच विलेपार्ले येथे यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षेत यशस्वी झालेल्यांचा राज ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दाऊदचा कथित कॉल प्रकरण आणि स्वीय सहायकाच्या लाचखोरी प्रकरणी एकनाथ खडसे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. या संदर्भात बोलताना राज म्हणाले की, ‘आपल्याकडे कोणत्याही विषयावर चर्चा चालत राहते. दाऊद पाकिस्तानमधून स्वत:ची यंत्रणा संभाळतो. तो तिथून खडसेंना कशाला फोन करेल, एवढी वाईट वेळ त्याच्यावर आली आहे का, आपल्याकडे काहीही झालं की लगेच तर्कवितर्क लावले जातात. सगळी मज्जा मज्जा चालली आहे,’ या शब्दांत राज यांनी या प्रकरणाची खिल्ली उडवली. महाराष्ट्रात मराठी तरुणांना आधी नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. त्यानंतर, उरलेल्या नोकऱ्या बाकीच्यांना दिल्या जाव्यात. स्थानिकांना प्राधान्य देण्याचा मुद्दा जागतिक स्तरावरही चर्चिला जातोय. स्थानिकांच्या मुद्द्यावरच इंग्लंडने युरोपियन संघाबाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आता आणखी अनेक देश तेच करतील, पण इकडे मी हा मुद्दा उचलला की, लगेच संकुचिततेचा ठपका ठेवला जातो, असे सांगत युपीएससी, एमएपीएससीत यश मिळवित अधिकारी झाल्यानंतर महाराष्ट्राच्या विकासाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन राज यांनी केले. (प्रतिनिधी)