शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

धुळे - शहर हद्दवाढीबाबत संभ्रम कायम!

By admin | Updated: August 21, 2016 18:43 IST

महापालिकेने गेल्या दोन वर्षांपासून प्रस्तावित केलेली शहर हद्दवाढ अजूनही होण्यास तयार नसून प्रस्तावाबाबतच साशंकता निर्माण झाली आहे़

ऑनलाइन लोकमतधुळे, दि. २१ : महापालिकेने गेल्या दोन वर्षांपासून प्रस्तावित केलेली शहर हद्दवाढ अजूनही होण्यास तयार नसून प्रस्तावाबाबतच साशंकता निर्माण झाली आहे़ तर दुसरीकडे आमदार अनिल गोटे यांनी नवीन प्रस्ताव कधीच शासनाला सादर करण्यात आला असून शहर हद्दवाढीची घोषणा कधीही अचानकपणे केली जाऊ शकते, असे ‘लोकमत’शी बोलतांना स्पष्ट केले़.महापालिकेने मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार शहर हद्दवाढीची प्रक्रिया दोन वर्षापूर्वी सुरू केली होती़ तत्पूर्वी प्रक्रिया संथगतीने सुरू होती मात्र दोन वर्षांपूर्वी शहर हद्दवाढीच्या हालचाली गतीमान झाल्या होत्या़ मनपाचे तत्कालिन प्रभारी आयुक्त के़व्ही़धनाड यांच्या कार्यकाळात हद्दवाढीचा प्रस्ताव अजेंड्यावर आला़ हद्दवाढीच्या प्रस्तावात सुचविण्यात आलेली पाचपटीपेक्षा अधिक वाढ पाहून तत्कालिन जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ देखील अवाक् झाले होते़ त्यानंतर चारवेळा बदल करून अंतिम प्रस्ताव तत्कालिन जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांच्या अभिप्रायासह शासनाला सादर करण्यात आला होता़.

जिल्हाधिकारी मिसाळ यांनी पालिकेची परिस्थिती डोळयासमोर ठेवून केवळ चारच गावे हद्दवाढीत घेणे योग्य होईल, असा अभिप्राय दिला होता़ त्यानंतर आमदार अनिल गोटे यांच्या पत्रामुळे मुख्यमंत्र्यांकडे फेब्रुवारी महिन्यात बैठक झाली व त्या बैठकीत प्रस्तावित क्षेत्र वाढविण्याची मागणी आमदार गोटेंनी केली़ त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी क्षेत्र वाढवून नव्याने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते़ मात्र त्यानंतर नवीन प्रस्तावाच्या गटांगळया सुरू आहेत़

संभ्रमावस्था कायम!मनपा प्रशासनाने प्रस्तावित १६ पैकी १५ गावे कायम ठेवली असून त्यात लळींग गाव वगळण्यात आले आहे तर सावळदे गावाचा नव्याने समावेश करण्यात आला आहे़ नवीन नकाशे तयार करून मनपा प्रशासनाने ते जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केल्याची माहिती दिली असली तरी या बाबत दोन महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरही प्रस्ताव शासनाकडे गेला किंवा नाही हे अजून स्पष्ट झालेले नाही़ तत्कालिन जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी बदल झालेला प्रस्ताव आपण असेपर्यंत तरी शासनाला पाठविण्यात आला नसल्याचे स्पष्ट केले तर नवनियुक्त जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी माहिती घेऊन सांगणार असल्याचे ‘लोकमत’शी बोलतांना स्पष्ट केले़ तर आमदार अनिल गोटे यांनी प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला सादर झाला असून त्यातील आवश्यक ते बदल देखील करण्यात आले आहेत़ आता कोणत्याही क्षणी शहर हद्दवाढीची अचानक घोषणा केली जाऊ शकते, अशी माहिती दिली़ त्यामुळे नेमकी स्थिती काय हा प्रश्न निर्माण झाला आहे़