शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात धुवांधार

By admin | Updated: August 1, 2016 03:22 IST

शनिवार रात्रीपासून कोसळत असलेल्या धुवाधार पावसाने ठाणे जिल्ह्याला जोरदार तडाखा दिला.

टीम लोकमत,

ठाणे- शनिवार रात्रीपासून कोसळत असलेल्या धुवाधार पावसाने ठाणे जिल्ह्याला जोरदार तडाखा दिला. दिवसभर सूर्यदर्शनही झाले नाही. या संततधारेमुळे जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था पूर्णत: कोलमडून पडली. खड्डे आणि पावसामुळे रस्त्यावरील वाहतूकही ठिकठिकाणी तुंबली होती. नालेसफाईचे दावे वारंवार केल्यानंतरही सखल भागांत पाण्याचा पुरेसा निचरा न झाल्याने अनेक घरांत पाणी शिरले. आषाढ अमावस्येच्या पार्श्वभूमीवर येत्या दोन दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. >वरूणराजा बरसलारात्रभर कोसळत असलेल्या पावसाने रविवारी ठाणे शहराची पार दैना केली. सखल भागात नेहमीप्रमाणे पाणी तुंबले असले तरी चेना नदीच्या पाण्यामुळे आणि रस्त्यांंतील खड्ड्यामुळे घोडबंदर रसत बराचकाळ ठप्प होता, तर भिवंडीकडे जाणाऱ्या वाहतुकीलाही तुंबलेले पाणी आणि खड्ड्यांचा फटका बसला.>तुफान फटकेबाजीजिल्ह्यासह शहरातही रविवारी पावसाने दमदार हजेरी लावल्याने सखल भागांत पाणी साचले, तर मुंब्रा बायपासवर दरड कोसळली. दरम्यान, कासारवडली येथे सहलीसाठी आलेले १२ पर्यटक पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्यामुळे अडकले होते. तसेच माजिवडा येथे एका शाळेत ६० विद्यार्थी परीक्षेसाठी आले होते. शाळेत पावसाचे पाणी भरल्याचे समजताच ठाणे पालिकेचा आपत्कालीन विभाग आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांची सुरक्षित सुटका केली. सखल भागांत पाणी साचल्याने त्याचा परिणाम वाहतुकीवरही झाला. संततधार पावसाने शहरात अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या तक्र ारी येताच महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आपत्कालीन कक्षात तळ ठोकून परिस्थितीचा आढावा घेत होते. त्यांनी तत्काळ विविध अधिकाऱ्यांची पथके तयार करून त्यांना प्रभाग समित्यांनुसार फिरण्याच्या सूचना दिल्या. तसेच कार्यकारी अभियंते आणि सहायक आयुक्तांनाही प्रभाग समित्यांमधून फिरून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले. त्यामुळे नागरिकांच्या तक्र ारी लगेच सुटल्या. महापौर संजय मोरे यांनीही आपत्कालीन कक्षात बसून परिस्थितीचा आढावा घेतला.