शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

नवरदेवाला घेऊन घोड्याने ठोकली धूम

By admin | Updated: April 24, 2017 03:08 IST

लग्नाच्या वरातीतून नवरदेवाला घेऊन घोड्याने धूम ठोकली. मात्र, घटनास्थळापासून काही अंतरावर नवरदेव घोड्यावरून खाली पडून जखमी झाला.

श्रीगोंदा (जि. अहमदनगर) : लग्नाच्या वरातीतून नवरदेवाला घेऊन घोड्याने धूम ठोकली. मात्र, घटनास्थळापासून काही अंतरावर नवरदेव घोड्यावरून खाली पडून जखमी झाला. बोहल्यावर चढण्यापूर्वीच दवाखान्यात उपचार करण्याची वेळ त्याच्यावर आली. रविवारी सकाळी ११च्या सुमारास श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथे ही घटना घडली.चांडगाव येथील रामदास म्हस्के यांचे चिरंजीव सचिन व रुई छत्तीशी येथील प्रमोद भवर यांची कन्या सुप्रिया यांचा विवाह रविवारी होता. नवरदेवाची सकाळी ११च्या सुमारास घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली. नवरदेवाचे मित्र डिजेच्या तालावर बेभान होऊन नाचत होते आणि नवरदेवाचा घोडाही नृत्य करीत होता. डिजेच्या आवाजाने घोडा अचानक बिथरला आणि त्याच वेळी नाचविणाऱ्याच्या हातून लगाम सुटल्याने घोड्याने नवरदेवासह धूम ठोकली.साधारण १ कि.मी. अंतरापर्यंत ग्रामस्थ व नातेवाईक घोड्याच्या मागे धावले. त्या वेळी नवरदेव घोड्यावरून पडून जखमी झाल्याचे दिसले. नातेवाईकांनी त्याला दवाखान्यात नेऊन उपचार केले. त्यानंतर, सुमारे तासाभर उशिरा सचिन व सुप्रिया विवाहबद्ध झाले. (तालुका प्रतिनिधी)