शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धनंजय मुंडेंवर दावा दाखल करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 03:24 IST

एका शेतक-याच्या नावावर ५०० कोटी रुपयांचे कर्ज उचल्याचा आरोप केल्याप्रकरणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार

परभणी : एका शेतक-याच्या नावावर ५०० कोटी रुपयांचे कर्ज उचल्याचा आरोप केल्याप्रकरणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे गंगाखेड शुगरचे अध्यक्ष रत्नाकर गुट्टे यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.मुंडे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत एका शेतकºयाच्या सातबारावर ५०० कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचा आरोप गुट्टे यांच्यावर यांच्यावर केला होता. गुट्टे यांनी विधानपरिषदेत सादर केलेली सातबारा आणि फेरफार उतारा पत्रकारांसमोर दाखविला. ते म्हणाले, दादाराव सीताराम पंडित या शेतकºयाचा हा सातबारा असून यावर पंडित यांच्या नावे १ लाख रुपयांचे कर्जाचा बोजा दाखविला आहे. तर तर याच गट नंबरमध्ये असलेल्या गंगाखेड शुगर अ‍ॅण्ड एनर्जी प्रा.लि. सुनील रत्नाकर गुट्टे तर्फे मुख्त्यारआम योगेंद्र अन्नालाल पटेल यांच्या नावे ५०२ कोटी ४० लाख रुपयांचा बोजा दाखविला आहे. त्याचा तपशील फेरफारमध्ये दिला असून हे कर्ज सर्व्हे नं.१५५, १५६, १५८, १६०, १६१, १६७, १७८ आणि १७९ या सर्व्हे नंबरवरील जमिनीवर बोजा असल्याचे नमूद केले आहे. दादाराव पंडित यांची जमीन या सर्व्हे नंबर लगत असल्याने त्यांच्या सातबारावर हा कर्जाचा उल्लेख आला आहे. तसेच २९ जुलै रोजी तलाठी सज्जातून काढलेल्या प्रमाणपत्रावरही मौजे पोखर्णी ता.गंगाखेड येथील गट नं.१६१ मध्ये दादाराव पंडित यांच्या नावे सातबारा नोंदीप्रमाणे या जमिनीवर कोणतेही कर्ज नाही. गट नं.१६१ वर गंगाखेड शुगर एनर्जी प्रा.लि. नावे फेर क्रमांक ९०३ नुसार ५०२ कोटी रुपयांचे कर्जआॅनलाईन नोंदीप्रमाणे आहे. त्यामुळे विधानपरिषदेत मुंडे यांनी केलेला आरोप चुकीचा असून याविरुद्ध आपण १ हजार कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे गुट्टे यांनी सांगितले.