शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांच्या निधनावर धनंजय मुंडेंचं राजकारण - पंकजा मुंडेंचा टोला

By admin | Updated: August 25, 2014 17:25 IST

गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूनंतरही धनंजय मुंडे यांच्याकडून राजकारण सुरू असल्याचा टोला गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आमदार पंकजा मुंडे यांनी लगावला.

ऑनलाइन टीम 
मुंबई, दि. २५ - भाजपाचे ज्येष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूनंतरही धनंजय मुंडे यांच्याकडून राजकारण सुरू असल्याचा टोला गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आमदार पंकजा मुंडे यांनी लगावला. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्या बोलत होत्या. 
मृत्यूवरचे राजकारण करणे चुकीचे आहे असे सांगतानाच जर सीबीआयच्या चौकशीत काही गडबड आढळली तर मी स्वत: गप्प बसणार नाही असे सांगायला पंकजा मुंडे या विसरल्या नाहीत. गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाताविषयी आणि सीबीआयच्या चौकशीबाबत अद्याप कोणी का माहिती देत नाही असा सवाल करून जर आपल्याला ही माहिती मिळाली नाही तर आपण स्वत: दिल्लीला जावून आंदोलन करू असा इशारा राष्ट्रवादीचे आमदार आणि गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे यांनी नुकतेच दिले आहेत. या प्रश्नाची आठवण करून देत पत्रकारांने मुलाखतीत  पंकजा मुंडे यांना प्रश्न विचारला त्याला उत्तर म्हणून पंकजा यांनी काही लोक राजकारण करीत  असल्याचे म्हटले. केंद्रात भाजपाचे सरकार असून राजनाथ सिंग हे केंद्रीय गृहमंत्री आहेत त्यामुळे आपल्याला दिल्लीत जावून आंदोलन करण्याची गरज नाही. सीबीआय त्यांचे काम करीत आहे. त्यात हस्तक्षेप करण्याची गरज नाही पण  ज्यावेळी सीबीआयचा रिपोर्ट येईल त्यावेळी त्यात काही गडबड असेल तर आपण गप्प बसणार नसल्याचे पंकजा यांनी सांगितले. पंकजा मुंडे या सध्या पुन्हा संघर्ष यात्राच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी घेत आहेत. गोपीनाथ मुंडे यांनी याआधी सत्ताधा-यांच्या विरोधात संघर्ष यात्रा काढली होती. हाच धागा पकडून पंकजा यांनी पुन्हा संघषयात्रा  सुरूवात केली आहे.