शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सरकार दुष्काळ दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा धनंजय मुंडेंचा आरोप

By admin | Updated: March 8, 2016 16:47 IST

शेतक-यांच्या तोंडाला सरकारने वर्षभर पाने पुसली आहेत. 1972 पेक्षाही भीषण दुष्काळ असताना अजूनही दुष्काळ जाहीर केला नाही. सरकार दुष्काळ दाबण्याचे काम करत आहे

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. ८ - सर्व आघाडयांवर अपयशी ठरलेल्या सरकारच्या चहापानावर आम्ही बहिष्कार टाकत आहोत. जनतेला प्यायला पाणी नाही, जे साधे पाणीही  देऊ शकत नाहीत अशा सरकारच्या चहापानाला कशाला जायचे ?  म्हणून आम्ही चहापानावर बहिष्कार टाकत असल्याचं सांगत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारच्या कारभारावर टीका केली आहे.
 
बुधवारपासून सुरु होणा-या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर  विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे गटनेते यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली.  या पत्रकार परिषदेत सरकारच्या कामकाजावर जोरदार टीका करण्यात आली. शेतक-यांच्या तोंडाला सरकारने वर्षभर पाने पुसली आहेत. 1972 पेक्षाही भीषण दुष्काळ असताना अजूनही दुष्काळ जाहीर केला नाही. सरकार दुष्काळ दाबण्याचे काम करत आहे. बाकी राज्यात चांगला पाऊस पडूनही दुष्काळ जाहीर झाला, राज्यात का होत नाही असा सवाल धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान विचारला आहे. 
 
मंत्र्यानी मराठवाड्याचे दुष्काळी पर्यटन केले; जगलरी शब्दाचा खेळ करणारे हे सरकार आहे. मराठवाड्यातील 3 जिल्ह्यांना दिलेले 500 कोटी रु पूर्वीच्याच जाहीर 2 हजार कोटी पैकी आहेत, यात नवीन काही नाही. कापसाचा पीक विमा आणि अनुदानाबाबत हि दळभद्री निर्णय घेतले जात आहेत. 4 महिन्यांपासून चारा छावण्यांची बिले दिले नाहीत. 50 कोटींनी काही होणार नाही. बीड, लातूरमध्येच 60 कोटी पेक्षा जास्त देणे आहे असं धनंजय मुंडे बोलले आहेत. 
 
राज्यात कायदा सुव्यवस्था उरलेली नाही. राजकीय पक्षांची गुंडगिरी दिसत आहे. पोलिसच सुरक्षित नाही आहेत. डान्स बार बंदीबाबत खायचे अन दाखवायचे दात वेगळे आहेत. बार मालक आणि सरकार यांच्यात मिलिभगत आहे. पहिल्याच आठवड्यात डान्सबार बंदीचा कायदा आणून दाखवा असं आव्हान धनंजय मुंडेंनी केलं आहे. 
 
मुंबई महापालिकेतील मागील 10 वर्षातील  कामाचे कॅग मार्फत विशेषलेखापरीक्षण करा. मेक इन इंडिया म्हणजे भुलभूलय्या आहे. गुंतवणुकीचे दावे खोटे आहेत, औद्यागिक घसरण झाली. किती गुंतवणुक आली याची श्वेतपत्रिका काढावी. राज्याची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. मराठा, मुस्लिम, धनगर आरक्षण खोळंबत ठेवले आहेत. मंत्र्याचे घोटाळे मुख्यमंत्र्यांनी पाठीशी घातले, शेतक-यांना पीए मार्फत मारहाण करणा-या शिक्षण मंत्री यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली.