ऑनलाइन टीम
बारामती, दि. २९ - धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षण प्रश्नी मागील ८ दिवसांपासून बारामतीत सुरू असलेले उपोषण महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत अखेर आज मागे घेण्यात आले. महायुतीच्या नेत्यांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे धनगर समाज कृती समितीतील कार्यकर्त्यांनी हे उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला.
धनगरांना एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावे, अशी धनगर समाजाची मागणी होती. यास पाठिंबा देण्यासाठी महायुतीचे नेते आज येथे आले होते. भाजप नेते देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, माधव भंडारी तसेच शिवसेनेचे आमदार विजय शिवतरे आदी नेत्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. आंदोलकांनी तोडफोडीमध्ये शक्ती वाया घालवू नये असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिला.