शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

धनगर आरक्षणाबाबत निर्णय १५ दिवसांत!

By admin | Updated: January 5, 2015 00:56 IST

धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याच्या दृष्टीने आगामी १५ दिवसांत महाधिवक्त्यांसोबत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिली.

मुख्यमंत्र्यांची ग्वाही: महाधिवक्त्यांसोबत घेणार बैठकनागपूर : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याच्या दृष्टीने आगामी १५ दिवसांत महाधिवक्त्यांसोबत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिली. धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने आयोजित आरक्षण अंमलबजावणी अधिवेशनात ते बोलत होते़ अध्यक्षस्थानी विधानसभेतील ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख होते. व्यासपीठावर गृह राज्यमंत्री राम शिंदे, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्यासह समाजाचे नेते उपस्थित होते़आरक्षणाच्या मुद्यावर धनगर समाज आक्रमक भूमिकेत होता व त्याचा प्रत्यय उपस्थित नागरिक आणि व्यासपीठावरील नेत्यांच्या भाषणातूनही व्यक्त होत होता. हा मूड लक्षात घेऊनच मुख्यमंत्र्यांनी सरकारची बाजू मांडली. धनगर समाजाला आरक्षण लागू करण्यासाठी दिलेल्या शब्दावर आम्ही ठाम आहोत. घाईघाईने हा निर्णय घेतल्यास मराठा आरक्षणाप्रमाणे न्यायालयात तो टिकणार नाही. म्हणून याला कायदेशीर चौकटीत बसविण्यासाठी येत्या १५ दिवसांत धनगर समाजाच्या नेत्यांसोबत राज्याच्या महाधिवक्त्यांसोबत बैठक घेऊन चर्चा केली जाईल व त्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.याप्रसंगी गृहराज्य मंत्री राम शिंदे यांनी सरकारमध्ये राहून याबाबत पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले, तर महादेव जानकर यांनी नवीन सरकारला थोडा वेळ द्यावा, अशी विनंती उपस्थितांना केली. डॉ. विकास महात्मे यांनी आरक्षण आंदोलनादरम्यान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देत आरक्षणाच्या मागणीबाबत कुठलीही तडजोड न स्वीकारण्याचा इशारा दिला. (प्रतिनिधी)राज्य धनगर समाज संघर्ष समितीनुसार धनगर जमातीचा समावेश हा यापूर्वीच अनुसूचित जमातीत करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या अनुसूचित जाती व जमाती मंत्रालयाच्या सूचीत तसा उल्लेख आहे. तसेच राज्य शासनाच्या ग्राम पंचायत अधिनियम १९५९ मध्येही आणि वन व महसूल खात्याच्या जी.आर. मध्ये सुद्धा हा उल्लेख आहे. धनगर आणि धनगड हा वाद उच्चारातून निर्माण झाला आहे त्या आधारावर धनगर समाजाला सवलती नाकारण्यात येत आहेत, असे समितीचे अध्यक्ष डॉ. विकास महात्मे यांनी सांगितले.