शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

चंदू चव्हाणच्या सुटकेसाठी डीजीएमओ स्तरावरची प्रक्रिया - संरक्षणमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2016 15:08 IST

मुळचा धुळे जिल्ह्यातील व ३७ राष्ट्रीय रायफल्समध्ये असलेला जवान चंदू चव्हाण यांना परत आणण्यासाठी लष्करी कारवायांचे महासंचालक (डीजीएमओ) त्यांच्या पातळीवर प्रयत्न सुरू आहेत

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. २ : अनावधानाने नियंत्रण रेषा ओलांडलेल्या व पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय जवानाच्या सुटकेसाठी केंद्र सरकारने शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. मुळचा धुळे जिल्ह्यातील व ३७ राष्ट्रीय रायफल्समध्ये असलेला जवान चंदू चव्हाण यांना परत आणण्यासाठी लष्करी कारवायांचे महासंचालक (डीजीएमओ) त्यांच्या पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अशी माहिती संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डातर्फे स्वच्छ भारत उपक्रमा अंतर्गत आयोजित केलेल्या कार्यक्रमात पर्रीकर सहभागी झाले होते. यावेळी पर्रीकरांनी ही माहिती दिली. पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईक व धुळ्याचे जवान चंदू चव्हाण यांचा पाकिस्तानच्या हद्दीत जाण्याचा काही संबंध नाही. चुकून ताबारेषा ओलांडून समोरील देशाच्या हद्दीत गेलेल्या जवानांना परत पाठविण्यासाठी स्टॅण्डर्ड मेकॅनिझम ही कार्यपध्दती पूर्वीपासूनच आहे. चंदू चव्हाण यांनीही चुकून ताबारेषा ओलांडली आहे. त्यांना परत आणण्यासाठी याच पद्धतीचा वापर केला जात आहे,असे पर्रीकर यांनी सांगितले.

पर्रीकर म्हणाले, भारतीय हवाई दलासाठी राफेल ही अत्याधुनिक विमाने खरेदी करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. करारानुसार ही विमाने ३६ महिन्यात भारतीय हवाई दलात समाविष्ट होणे आवश्यक आहे. परंतु, त्यापूर्वीच काही महिने ही विमाने भारतीय हवाई दलात दाखल होतील